गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा ‘टीझर’ 

मुंबई - 'पानिपत', ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र रिलीज झाला आहे. गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरु होणाऱ्या ‘हिंदू संवत्सराचा’ आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त. ‘उंचावणाऱ्या नव्या आशांचे’ प्रतिक म्हणजे गुढी आणि याच गुढीच्या पलीकडून येणारी आशेची किरणं, कोरोनाच्या भीषण अनुभवांच्या पलिकडचं जग आपल्याला दाखवतील. हे ही दिवस जातील, फक्त गरज आहे संयमाची असा सकारात्मकतेचा संदेश देऊन हा टीझर प्रदर्शित करण्य़ात आला आहे.

या पहिल्या टीझरमध्ये संगीत जगतातले अनभिषिक्त सम्राट – ‘अजय अतुल’ यांचे संगीत गुणगुणत राहावं असं आहे. निर्माते अक्षय बर्दापूरकर व त्यांचा भारतातील पहिला-वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म – ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे ‘फ्लाईन्ग ड्रॅगन’ हे सह-निर्माते आहेत. ‘एबी आणि सीडी’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांच्या पाठोपाठ आता ‘चंद्रमुखी’ सिनेमाच्या निर्मितीतही ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ निर्माते म्हणून एकत्र आहेत. या चित्रपटाची, पटकथा आणि संवाद आहेत चिन्मय मांडलेकर यांचे. संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी,  अजय-अतुल चं अस्सल मातीतलं मराठमोळं संगीत आणि प्रसाद ओक चं दिग्दर्शन.

आजचा गुढीपाडवा नक्कीच गोड झाला आहे. गुढीच्या या गोड गाठीची, भरजरी शेल्याची, मोहक वासाच्या फुलांची गुंफण म्हणजेच ‘चंद्रमुखी’आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्लॅनेट मराठीच्या युट्युब चॅनेलवर रिलीज झालेला ‘चंद्रमुखी’चा टीझर प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींना त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर उपाययोजनाही केल्या जात आहे. यासगळ्या परिस्थितीचा फटका निर्माते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. त्यामुळे चित्रपट, मालिकांचे चित्रिकरण रखडले आहे. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3dd7Xic

रामदेव बाबाच 'शक्तिमान'; इंडियन आयडॉलमध्ये उचलला सिलिंडर 

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कोरोनाला कशाप्रकारे सामोरं जावं असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. कोरोनाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. आतापर्यत चित्रपट आणि मालिकेतील वेगवेगळ्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील परिस्थिती बिकट आहे. इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमाचे पुढील भागाचे चित्रिकरण झाले आहे. कोरोनामुळे चित्रिकरण लांबु नये हा त्यामागील उद्देश आहे. इंडियन आयडॉल 12 च्या मेकर्सनं काही एपिसोड शुट केले आहेत. या कार्यक्रमामध्ये नवनवीन सेलिब्रेटी सहभागी होत असतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये बाबा रामदेव यांनी हजेरी लावली होती. हा भाग ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांची पसंती मिळाल्याचे दिसून आले.

बाबा रामदेव यांच्या अचाट शक्तीचा यावेळी प्रेक्षकांना प्रत्यय आला आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही ट्रीक सांगितल्या. कोरोनाच्या दरम्यान काळजी घेण्याचे आवाहनही बाबांनी चाहत्यांना केले. बाबांनी याप्रसंगी असे काही केले की त्यामुळे त्या कार्यक्रमाचा होस्ट असणारा जय भानुशाली अवाक झाला. इंडियन आयडॉल 12 च्या सेटवरील बाबा रामदेव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावेळी ते जय भानुशाली याच्यासोबत मस्ती करताना दिसून आले. याचा व्हिडिओ फोटोग्राफर विरल भयानीनं आपल्या सोशल मीडिय़ाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

बाबा रामदेव यांनी हातात सिलेंडर घेतल्याचे दिसून आले आहे. याप्रसंगी जय भानुशाली बाबा रामदेव यांच्याजवळ बसल्याचे दिसून आले आहे. हा फोटो व्हायरल करताना विरल भयानीनं त्या फोटोंना कॅप्शनही दिलं आहे. त्यानं लिहिलं आहे, बाबा रे बाबा. त्या फोटोला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंटही केल्या आहेत. अर्थात अशा प्रकारचा स्टंट बाबांनी काही पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शक्तिप्रदर्शन करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या योगाच्या प्रात्यक्षिकांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

गुढीपाडवा स्पेशल; पहा मराठमोळ्या अभिनेत्रींच्या घरातील सण

पंधरा सिनेमे, सलमानच्या रोलचं नाव 'प्रेम'; वाचा काय आहे कारण! |

रामदेव बाबांनंतर या मालिकेत आता अभिनेत्री जया प्रदा यांचीही एंट्री होणार आहे. यावेळी सर्व स्पर्धक जया प्रदा यांच्या चित्रपटातील गाण्यांवर परफॉर्म करणार आहेत. बाबा रामदेव आणि जया प्रदा हे दोघेही स्पर्धकांचा उत्साह वाढवताना दिसणार आहेत. इंडियन आयडॉलच्या 12 व्या सीझनमध्ये गायिका नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी जज म्हणून काम पाहणार आहेत. आतापर्यत या कार्यक्रमांमध्ये नीतु कपूर, जितेंद्र, एकता कपूर आणि ए आर रेहमान आले आहेत. 
  from Manoranjan Feeds https://ift.tt/2PXW2Mp

अर्जुनने खरेदी केली आलिशान Land Rover Defender; जाणून घ्या गाडीची किंमत

अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने इन्स्टाग्रामवर हातात मंगळसूत्र घेऊन फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्याच्या आणि गर्लफ्रेंड मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर आता अर्जुन त्याच्या नव्या आलिशान गाडीमुळे चर्चेत आला आहे. अर्जुन कपूरने नवी आलिशान लँड रोव्हर डिफेंडर एसयुव्ही खरेदी केली आहे. अर्जुन ही महागडी गाडी चालवत असताना पापाराझींनी त्याचे फोटो काढले असून तेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुनने विकत घेतलेल्या गाडीचा मॉडेल हा २०२१ लँड रोव्हर डिफेंडर ११० फर्स्ट एडिशन आहे. 

अर्जुनने विकत घेतलेल्या गाडीची किंमत
अर्जुनने विकत घेतलेल्या गाडीमध्ये इंजिनचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. P300 AWD हा २.० लिटर पेट्रोल इंजिनसह आणि P400 AWD हा ३.० लिटर पेट्रोल इंजिनसह आहे. या गाडीची किंमत १.१३ कोटी आणि १.२१ कोटी रुपये अनुक्रमे आहे. अर्जुनने पहिल्यांदाच आलिशान SUV घेतली नाही. तर याआधी २०१७ मध्ये त्याने Maserati Levante ही महागडी गाडी विकत घेतली होती. या गाडीची किंमत १.६५ कोटी रुपये इतकी आहे. अर्जुन कपूरकडे Audi Q5 आणि Honda CR-V या दोन गाड्यासुद्धा आहे. 

हेही वाचा : दत्तक घेतलेल्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला मंदिरा बेदीने सुनावलं 

अर्जुनच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, त्याचा 'संदीप और पिंकी फरार' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तो 'भूत पोलीस' आणि 'एक विलन रिटर्न्स' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3tgeFtt

पंधरा सिनेमे, सलमानच्या रोलचं नाव 'प्रेम'; वाचा काय आहे कारण!

मुंबई :  बॅालिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.  90 च्या दशकापासून ते आत्तापर्यंतच्या सलमानच्या प्रत्येक चित्रपटातील डायलाॅग आणि गाण्याचे फॅन्स खूप आहेत. अशा या चुलबूल पांडेचा प्रत्येक चित्रपट ईदला प्रदर्शित होतो. सलमानचा १९८९मध्ये प्रदर्शित झालेला सुपर हिट चित्रपट 'मैने प्यार किया' मधील सलमानच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. या सिनेमामध्ये त्याच्या भूमिकेचे नाव 'प्रेम' होते. या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. मैने प्यार किया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी केले होते. 

गुढीपाडवा स्पेशल; पहा मराठमोळ्या अभिनेत्रींच्या घरातील सण

सलमाच्या चित्रपटात भूमिकेचे नाव प्रेम ठेवण्यास राजश्री प्रोडक्शनच्या सुपरहिट चित्रपट 'दुल्हन वही जो पिया मन भाये' मधून झाली होती. त्यानंतर राजश्री प्रोडक्शनच्या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक चित्रपटात त्याचे नाव प्रेम असे ठेवण्यात आले होते. ज्या चित्रपटामध्ये सलमानच्या भूमिकेचे नाव प्रेम असेल तो चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडणार असे राजश्री प्रोडक्शनला वाटू लागले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक चित्रपटात सलमानच्या भूमिकेचे नाव प्रेम ठेवले. सूरज बडजात्या आणि सलमान खान या दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या जोडीने मैने प्यार किया नंतर अनेक चित्रपटांची निर्मीती केली. हम आपके हैं कोन', 'हम साथ साथ हैं', 'प्रेम रतन धन पायो' या राजश्री प्रोडक्शनच्या सुपर हिट चित्रपटांमध्ये सलमानच्या भूमिकेचे नाव प्रेम होते. 

 

'अंदाज अपना अपना', 'मैंने प्यार क्यों किया', 'जुड़वा', 'दीवाना मस्ताना', 'बीवी नंबर 1', 'कहीं प्यार ना हो जाए', 'नो एंट्री', 'पार्टनर', 'रेडी' यासारख्या चित्रपटात सलमानचं नाव प्रेम होतं. त्यामुळे प्रेम नावाचे आणि सलमान खानचे नाते जुने आहे असे म्हणता येईल.from Manoranjan Feeds https://ift.tt/3mLuwOi

गुढीपाडवा स्पेशल; पहा मराठमोळ्या अभिनेत्रींच्या घरातील सण

मुंबई : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा. या  दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभी करतात. उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी, काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. तुमच्या आवडत्या कलाकारांनी देखील हा सण अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला आहे. चला तर मग, पाहूयात या सेलिब्रेटींनी गुढीपाडवा कसा साजरा केला. 

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिच्या घरच्या गुढीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिले, 'घरचा पाडवा...गुढी पाडवा'. या फोटोला सोनालीच्या चाहत्यांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहीले आहे,' सोनाली तु  खूप क्युट दिसत आहेस.' सोनालीने गुढीपाडव्यानिमित्त निळ्या रंगाची पैठणी घातली आहे. 

 

क्युट आणि ग्लॅमरस अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील तिच्या घरामध्ये .गुढी उभारली आहे. गुढीसोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले, 'गुढी पाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या खूप शुभेच्छा हिंदू परंपरा, संस्कृतीचा अवलंब करा'. या फोटोमध्ये प्राजक्ताने डार्क पिंक रंगाचा ड्रेस घातला आसून कानात सोनेरी रंगाचे झुबे घातले आहेत. 

 

मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील तिच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा साजरा केला. सोशल मीडियावर तिने तिचे पती स्वप्नील रावसोबत गुढीची पुजा करतानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी मृण्मयीने चॉकलेटी रंगाची साडी घातली आहे. तर स्वप्नीलने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.  

 

 
अमृता खानविलकर, जुई गडकरी, प्रिया मराठे, क्षिती जोग, शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, उर्मिला कोठारे या मराठी अभिनेत्रींने देखील त्यांच्या गुढीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 from Manoranjan Feeds https://ift.tt/3uKvs8f

बालकलाकार  ते 'अनुपमा'; रुपाली गांगुलीचा रंजक प्रवास 

गेल्या काही महिन्यांपासून मालिकाविश्वात आपलं वर्चस्व गाजवणारी मालिका म्हणजे 'अनुपमा'. स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका टीआरपीच्या यादीत अग्रस्थानीच असते. या मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरात लोकप्रिय झाली आहे. ती या मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून तिने अभिनयाला सुरुवात केली. या ३५ वर्षांपासून रुपाली चित्रपट आणि मालिकांमध्ये सक्रिय आहे. 

रुपालीचे वडील अनिल गांगुली हे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. रुपाली बालकलाकार म्हणून १९८५ मध्ये वडिलांच्याच चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर ती 'बलिदान' या चित्रपटात झळकली. तर २००० मध्ये रुपालीने 'सुकन्या' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं.  या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र २००३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'संजीवनी' या मालिकेत डॉक्टर सिमरनच्या भूमिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. यासाठी तिला इंडियन टेली अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळालं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rups (@rupaliganguly)

रुपालीने २००४ पासून २००६ पर्यंत 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेत काम केलं. यामध्ये तिने मोनिषा साराभाईची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठीसुद्धा तिला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचं इंडियन टेली अवॉर्ड्सचं नामांकन मिळालं होतं. याशिवाय तिने एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या मालिकेत गायत्री अग्रवालची भूमिका साकारली होती. रुपालीने 'काव्यांजली', 'बा बहू और बेबी', 'परवरिश' या मालिकांमध्येही काम केलं. 

हेही वाचा : दत्तक घेतलेल्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला मंदिरा बेदीने सुनावलं 

मालिकांशिवाय रुपालीने रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. 'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वात ती झळकली होती. तर २००९ मध्ये तिने 'खतरों के खिलाडी'च्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3sflqKu

दत्तक घेतलेल्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला मंदिरा बेदीने सुनावलं 

अभिनेत्री मंदिरा बेदीने गेल्या वर्षी जून महिन्यात मुलीला दत्तक घेतलं. मंदिराने दत्तक घेतलेल्या मुलीचं नाव तारा असून तिच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मंदिराने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीजमध्ये तारासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. मात्र या फोटोवर तारासाठी काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. या ट्रोलर्सना मंदिराने खडेबोल सुनावले आहेत. 'मॅडम, तुम्ही कोणत्या स्लमडॉग सेंटरमधून मुलीला दत्तक घेतलं?', असं एकाने विचारलं. त्यावर मंदिराने संबंधित युजरला सुनावलं. 

'यांसारख्या लोकांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. तू माझं लक्ष वेधून घेतलंस, तुझी मानसिकताच गलिच्छ आहे', अशा शब्दांत मंदिराने उत्तर दिलं. ट्रोल करणाऱ्या आणखी एका नेटकऱ्यालाही मंदिराने खडेबोल सुनावले. 'हा व्यक्ती स्वत:ला राजेश त्रिपाठी म्हणतोय. पण मला खात्री आहे की ते त्याचं खरं नाव नसेल. कारण अशा प्रकारचे लोक हे सर्वांत घाबरट असतात. अज्ञानाच्या ढालीमागे आपल्या जीभेची तलवार कशी चालवायची हेच या लोकांना माहित असतं', असं ती म्हणाली. 

May be an image of text that says "mandirabedi mandir abedi vish_wanathkumar actor actorshazadkhan rshazadkhan The adopted street looks completely out place greedy narcissists scarring the slumdog for ife!! iyotigautamdixit silverrauf the Rajesh model citizen. He Tripathi, which because More from his name, the biggest how calls definitely himself sn't Sickos too, their the shield like this, are only cowards wag behind of anonymity bollywoodforevaaamadamtromwhich adopt youprop king. kapura55 Sory People like this needtobe mention. given special Kudos you yot attention,"

हेही वाचा : परवीन बाबीमुळे कबीर बेदीने पत्नीला दिला होता नाव बदलण्याचा सल्ला

मंदिरा आणि निर्माता राज कौशल यांनी चार वर्षांच्या ताराला दत्तक घेतलं. मंदिराला एक मुलगा असून वीर असं त्याचं नाव आहे. तारासोबतचा फोटो पोस्ट करत मंदिराने लिहिलं होतं, 'ही माझी छोटी मुलगी तारा. वीरची बहीण. तारा बेदी कौशल असं तिचं नाव असून २८ जुलै २०२० पासून ती आमच्या कुटुंबाचा भाग झाली आहे.' मंदिराने १९९९ साली राजशी लग्नगाठ बांधली.from Manoranjan Feeds https://ift.tt/2RuNSLY