Power Bank ||Best Earning App 2021सनीचा मुलगा राजवीरची 'बॉलीवूड एंट्री'; आजोबा म्हणतात, सांभाळून घ्या

मुंबई -  बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयासाठी जी काही प्रसिध्द घराणी आहेत त्यात देओल फॅमिलीचे नावही घ्यावे लागेल. कपूर फॅमिली, खान ब्रदर्स, बच्चन फॅमिली, ही त्यांच्यापैकी काही उदाहरणं म्हणावी लागतील. धर्मेंद्र यांच्या अभिनयाची ताकद सर्वांना माहिती आहे. त्यांचा रुबाब, त्यांचं स्टारडम हेही सर्वांच्या चर्चेचा विषय़ असतो. सोशल मीडियावर त्यांचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. त्यांच्यानंतर सनी देओल, बॉबी देओल आणि अभय देओलनं त्यांचा वारसा पुढे सुरु ठेवला आहे. आता देओल कुटूंबियांतला एक स्टार पुढे येतो आहे. त्यावर आजोबांनी चाहत्यांना त्यांच्या खास भाषेत आवाहन केले आहे.

सनी देओलचा मुलगा राजवीर याचा बॉलीवूडमधील डेब्यु पक्का असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आजोबा धर्मेंद्र यांनी चाहत्यांना आवाहन केले आहे. यापूर्वी सनीचा मोठा मुलगा करण देओलनं बॉलीवूडमध्ये इंट्री केली होती. आता त्याचा लहान भाऊ मोठ्या पडद्यावर येणार असल्यानं चाहत्यांना त्याच्याबाबत उत्सुकता आहे. यावेळी सनी आणि बॉबी बरोबरच धर्मेंद्र यांनी देखील चाहत्यांना आपल्या नातवाला सांभाळून घ्या. असे आवाहन केले आहे. त्यांनी राजवीरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याशिवाय धर्मेंद्र यांनी राजवीरसाठी चाहत्यांना प्रेमळ विनंतीही केली आहे.

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, चित्रपटाच्या दूनियेत आता माझा नातु राजवीर येतो आहे. अवनीश बडजात्या हे दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटामध्ये तो दिसणार आहे. माझे तुम्हा सर्वांना सांगणे आहे की माझ्या दोन्ही मुलांना तुमचा आशीर्वाद मिळू द्या. त्यांच्यावर प्रेम करा. मला जो आदर, प्रेम तुम्ही दिलं तेच त्यांनाही द्या. ही तुम्हाला विनंती. देव तुम्हा सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवो. ही प्रार्थना. 

 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/39rNCDl

एवढी मोठी स्टार, बाळासाठी घेतला 50 टक्के डिस्काऊंटचा पाळणा 

मुंबई - कलाकार मग तो लहान मोठा कुणी का असेना खरेदी करताना घासाघीस करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अभिनेत्री अनिता हसनंदानीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ आहे तिच्या पाळणा खरेदीचा तिनं नुकताच बाळासाठी एक पाळणा आणि कॉट खरेदी केली आहे. त्याची माहिती तिनं दिली. त्यावेळी तिचं काही जणांनी कौतूक केलं आहे. दुसरीकडे काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. त्याचे कारण म्हणजे मोठी अभिनेत्री असून तु डिस्काऊंट का घेते, असा सवाल तिला विचारला गेला आहे. फॅन्सच्या प्रश्नांकडे तिनं दुर्लक्ष केलं आहे. त्यांना उत्तरं देण्याऐवजी वस्तु खरेदी करण्याचा सल्ला तिनं दिला आहे.

अनिताला बाळासाठी एक पाळणा आणि कॉट खरेदी करायची होती. त्यानंतर तिनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तिनं सांगितलं त्यासाठी तुम्हाला 9 हजार 500 रुपये खर्च करावे लागतील. टीव्ही अॅक्ट्रेस म्हणून प्रसिध्द असणारी अनितानं काही दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला. ती आता पूर्ण वेळ मुलाबरोबर व्यतीत करत आहे. अनीतानं मुलगा आरवसाठी एक पाळणा खरेदी केला आहे. त्याचा एक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी अनितानं सांगितलं आहे की, तो महागडा पाळणा खरेदी करण्यासाठी त्याच्यावर 50 टक्के डिस्काऊंट मी घेतला आहे. अशाप्रकारची पोस्ट शेअर करताना तिनं एक मोठी नोटही लिहिली आहे.

अनीता हसनंदानी, Anita Hassanandani, Anita Hassanandani Baby , Aaravv Reddy, Rohit Reddy

अनितानं मुलगा आणि पती यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. तिनं लिहिलं आहे की, जेव्हा तुमच्याकडे लहान बाळ असते त्यावेळी तुम्हाला अधिक सावध व्हावे लागते. त्याच्या सुरक्षेसाठी काळजी घ्यावी लागते. यामुळे मी आणि रोहितनं एक सुपर क्युट पाळणा आणि कॉट घेण्याचा विचार केला आहे. आता मला कसली काळजी नाही. कारण आरव पाळण्यात असणार आहे. तो आता मुक्तपणे खेळु शकतो. झोपू शकतो. याचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळे तो मला फार त्रास देणार नाही.

अनितानं लिहिलं आहे की, जो ज्यावेळी माझ्या कुशीत असतो तेव्हा त्याला सुरक्षित वाटतं. तसचं त्याला ते पाळण्यात असल्यानंतर वाटेल याची खात्री आहे. तुम्हीही यासगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करा. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी पाळणा आणि कॉटचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त 9500 रुपये खरेदी करावे लागणार आहेत. त्याची मुळ किंमत 18 हजार 999 रुपये एवढी आहे. मात्र त्यावर पन्नास टक्के सुट मिळणार आहे.  

 from Manoranjan Feeds https://ift.tt/3sDDbEB

विधानसभेत जे घडलं ते खरं होतं, किस्सा 'थलाइवी' चा

मुंबई : नुकताच थलायइवी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटाचे कथानक तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

जयललिता यांच्या आयुष्यात किती संकटं आली आणि या संकटांना त्या कसं सामोरं गेल्या याची एक झलक ट्रेलरमध्ये दिसते. कला क्षेत्रातून त्यांनी राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सिन ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तो सिन म्हणजे जयललिता यांच्यावर विधानसभेत झालेला हल्ला. हा हल्ला खरंच जयललितांवर झाला होता का? की फक्त सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून हा सिन चित्रपटामध्ये घेण्यात आला आहे. त्यावेळी विधानसभेत नेमके काय झाले होते हे एका मुलाखतीत जयललिता यांनी सांगितले होतं.

संघर्षमय आयुष्य

जयललिता यांना अभिनेत्री किंवा राजकारणी व्हायचं नव्हतं. पण त्यांनी दोन्ही क्षेत्रात काम केलं आणि तिथं नावही कमावलं. एक आघाडीची अभिनेत्री आणि एका राज्याची मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. जयललिता या अभिनेत्री होत्या म्हणून राजकारणात सहज प्रवेश किंवा त्यांना सहज सगळं मिळालं असं नाही. लहानपणापासून ते राजकारणात मुख्यमंत्रीपद इथंपर्यंत त्यांना संघर्ष करावा लागला. लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं. त्यानंतर आईला घर सांभाळण्यासाठी चित्रपटांमध्ये काम करावं लागलं. यामुळे आई आणि मुलीच्या नात्यात दुरावा आला.

जयललिता या म्हैसूरला आजी आजोबांकडे राहायच्या. या वातावरणाचा त्यांच्या बालमनावर परिणाम झाला. सतत आईचा सहवास हवा असायचा पण भेट होणं कठीण होत गेलं. पुढे शिक्षणासाठी आईसोबत चेन्नईत यायची संधी मिळाली. तिथेही आईचं काम सुरूच असल्यानं जयललितांना सहवास दुर्मिळ होता. याकाळात एकट्या पडलेल्या जयललिता यांनी स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतलं. सतत पुस्तक वाचण्यात वेळ घालवणं पसतं करत असत. अभ्यासात हुशार असलेल्या जयललिता यांना खूप शिकायचं होतं, नोकरी करायची होती. पण नियतीलाच ते मान्य नसावं. 

चित्रपटात काम करणाऱ्या आईला नंतर वाढत्या वयामुळे काम मिळणं जवळपास बंद झालं होतं. त्यातच जयललिता यांचं शिक्षणही होतं. त्यावेळी जयललिता यांना चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर मिळाली. पण जयललिता यांनी काम करण्यास नकार दिला. आईला तसं स्पष्ट सांगितलं तरीही आईने त्यासाठी तगादा लावला. कुटुंब आणि भावंडांची जबाबदारी पेलवण्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे हे सांगून मुलीची समजूत काढली. शेवटी जयललिता तयार झाल्या आणि त्यांनी सिनेमात काम करणं सुरू केले.

जयललितांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्या एकट्या पडल्या. काही दिवसांनी जयललिता यांची भेट तत्कालीन प्रसिद्ध तमिळ अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांच्याशी झाली. जयललिता यांनी केलेल्या 125 पैकी तब्बल 40 पेक्षा जास्त सिनेमे एमजीआर यांच्यासोबत केले आहेत. सिनेमात काम करणं बंद केल्यानंतर खरंतर त्यांना आता एका हाऊसवाईफचं जीवन जगायचं होतं. पण, त्यांच्या वाट्याला ते आलंच नाही. एमजीआर यांनी त्यांना कधीच पत्नीचा दर्जा दिला नाही. तरीसुद्धा त्यांनी एमजीआर यांची पदोपदी साथ दिली.

राजकारणात प्रवेश

एमजीआर चित्रपट क्षेत्रातून राजकारणात आले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. एमजीआर यांच्याबरोबर जयललिता यांचीसुद्धा राजकारणात एंट्री झाली. पण, त्यावेळीही त्यांना फार मानाचं स्थान नव्हतं. जयललिता यांचा संघर्ष सुरूच होता. अशात एमजीआर यांच्या मृत्यूनं त्यांना आणखी एक धक्का दिला. एमजीआर यांच्या पार्थिवाजवळ सुद्धा त्यांना बसू देण्यात आलं नाही. त्यांना तिथून अपमानित करून हाकलून देण्यात आलं. अधिकृत पत्नीचा दर्जा नाही, अधिकृत उत्तराधिकारी म्हणून निवड नाही आणि स्वतःचं असं कुणीच आधार देण्यासाठी जवळ नाही अशा स्थितीत सापडलेल्या जयललिता यांना स्वतःला टिकवण्यासाठी राजकारणात सक्रिय राहणं भाग होतं.

त्यांनी तेच केलं. अण्णा द्रमुक या त्यांच्या पक्षात त्यांनी स्वतःची जागा शोधण्याचा संघर्ष नव्यानं सुरू केला. अशातच एमजीआर यांच्या काही निष्ठावंतांनी जानकी रामचंद्रन (एमजीआर यांच्या पत्नी) यांना राजकारणात आणून जयललिता यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण, जयललिताच त्या! आतापर्यंतच्या संघर्षात तावूनसुलाखून निघालेल्या. त्यांनीही कंबर कसली आणि स्वतःला झोकून दिलं. मुळात गृहिणी असलेल्या आणि राजकारणाचा गंध नसलेल्या जानकी रामचंद्रन यांचा जयललिला यांच्यापुढे टिकाव लागणं शक्यच नव्हतं.

विधानसभेत झालेला हल्ला

32 वर्षांपूर्वी 25 मार्च 1989 ला तमिळनाडू विधानसभेत जयललितांवर हल्ला झाला होता. तेव्हा त्यांच्या साडीचा पदर ओढण्यात आला. हल्ल्यानंतर तमिळनाडूमधील राजकारण बदलले. या हल्ल्याचा बदला म्हणून जयललितांना मुख्यमंत्री करण्यात आले. थलाइवी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला हल्ला हा 32 वर्षापूर्वी जयललितांवर विधानसभेतमध्ये अर्थसंकल्प सादर करताना झाला होता. त्यावेळी डीएमकेचे प्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री करूणानिधी यांनी बजेटचे संदर्भात भाषण करण्यास सुरूवात केली तेव्हा कॉंग्रेसच्या आमदारांनी याला विरोध केला.

प्रसिद्ध मुलाखतकार सिम्मी गरेवाल यांच्या शोमध्ये जयललितांनी सांगितले होत की, 'करूणानिधी यांच्या पक्षाच्या आमदारांनी मला मारहाण केली. त्यांनी माझे केस ओढले, त्यांनी माझ्यावर चप्पल फेकल्या, मोठमोठी पुस्तके देखील फेकली. त्या दिवशी मी रडत असेंबलिच्या बाहेर पडले. माझ्या मनात खूप संताप निर्माण झाला. त्यानंतर मी शप्पथ घेतली की मी या असेंबलीत पाय ठेवेन तेव्हा मी मुख्यमंत्री असेन आणि ही शप्पथ मी पूर्ण करून दाखवली. 

चित्रपटात कंगना साकारणार जयललितांची भूमिका डायलॉगने वेधले प्रेक्षकांचे लक्ष

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत कंगना दिसणार आहे. ट्रेलरमधील कंगनाच्या प्रत्येक डायलॉगला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. असेंब्लीमधील हल्ला झाल्यावर बाहेर पडतानाच्या सिनमध्ये कंगनाच्या डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या सिनमध्ये कंगना म्हणते, 'आज तुने जिस तरह भरी सभा में मेरा अपमान किया है, वैसाही चिर हरण कौरोवोने द्रौपदी का किया, वो सत्ता की लडाई भी वो जिती थी और ये सत्ता की लडाई भी मै जितूंगी क्यू की महाभारत का दुसरा नाम है जया!' या चित्रपटामध्ये जयललितांसोबत घडलेल्या प्रसंगाची तुलना द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगाशी केली आहे. द्रौपदीची तुलना जयललितां यांच्या सोबत केली आहे.from Manoranjan Feeds https://ift.tt/3wpps6C

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला अटक; एनसीबीचा दाट संशय  

मुंबई -  बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्याची बराचवेळ चौकशीही करण्यात आली. त्यानंतर त्याला एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं) अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर काही गोष्टींच्या संशयावरुन हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याला कोर्टातही हजर करण्यात येणार आहे. बटाटा गँगचा बॉलीवूडशी काही संबंध असल्याचा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे कडक कारवाईचे पाउल उचलण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीनं अभिनेता अर्जुन रामपालवरही वॉच ठेवला आहे.  तो आफ्रिकेला पळून जाणार होता. असे एनसीबाकडून सांगण्यात आले आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे एका चार्जशीटमधून हा खुलासा करण्यात आला आहे. दुसरं म्हणजे त्या चार्जशीट अनुसार एनसीबीनं रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रीकेच्या काऊंसलेट जनरला फोन करुन सदर प्रकरणाची माहिती दिली आहे.

बॉलीवूडमधील कथित ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असणा-या एजाज खानला मंगळवारी एनसीबीनं अटक केली आहे. एजाज हा काही दिवसांपासून शुटिंग निमित्तानं राजस्थानात होता. तो जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याला एनसीबीनं अटक केली. त्याला यापूर्वी 2018 मध्ये प्रतिबंधीत औषधांच्या सेवनप्रकरणी अटक करण्यात आली होती. एनसीबीच्या सुत्रांची अशी माहिती आहे की, एजाज खान आणि मुंबईतील ड्रग्ज प्रकरणातील सर्वात मोठे माफिय़ा बटाटा गँग यांच्यात काही संबंध आहेत. असा संशय एनसीबीला आहे. ड्रग्ज माफिया फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटा आणि त्याचा सहकारी शाहरुख खान यांची यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे. ज्याला गेल्या शुक्रवारी एनसीबीनं अटक केली होती. 

अर्जुन रामपाल आफ्रिकेला पळून जाणार होता, एनसीबीला होता संशय

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये जेव्हा एजाजला अटक केली होती तेव्हा तो नशेत होता. त्याच्याकडे 8 एक्सटेसी नावाची गोळी मिळाली. ती गोळी 2.3 ग्रॅंमची असून त्याची किंमत 2.2 लाख एवढी आहे. त्यावेळी मुंबई पोलिसनं त्याच्याकडून दोन मोबाईल आणि फोनही जप्त केले होते. जेव्हा त्याला पकडले त्याप्रसंगी एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी सुरु होती. 

आता आठ तास एजाजची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे. एनसीबीची टीम एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला इथल्या घरांवर छापेमारीची कारवाई करत आहे. याआधी एनसीबीने ड्रग्जची तस्करी करणाऱ्या शादाब बटाटाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याच्या चौकशीदरम्यान एजाजचं नाव समोर आलं. ड्रग्ज प्रकरणी एजाजचं नाव याआधीही समोर आलं होतं. एजाजनं यावर असे सांगितले आहे की, "माझ्या घरात चार झोपेच्या गोळ्या आढळल्या आहेत. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला होता आणि झोपेच्या गोळ्या ती नैराश्यावर मात करण्यासाठी घेत आहे", असं स्पष्टीकरण एजाजने दिलं. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3m9n2nD

कंगनाने दिली 'पगलैट' ला पसंती ; केले ट्विट

मुंबई : बॉलिवूडची कोन्ट्रवर्सि क्विन कंगना रणौत तिच्या सोशल मिडियावरील बोल्ड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक वेळा तिला सोशल मिडियावर ट्रोल केले जाते तर काही वेळा तिचे कौतुक केले जाते. राजकारण असो वा बॉलिवूड कंगना प्रत्येक विषयावर तिचे मत मांडते. कंगनाने क्वचितच एखाद्या व्यक्तीचे कौतुक केले असेल. नुकतेच अभिनेत्री सान्या मल्होत्राबद्दल कंगनाने ट्विट केले आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

कंगनाने नुकतेच अभिनेत्री सान्या मल्होत्राचे ट्विट रिट्विट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हे रिट्विट करून तिने लिहीले,' ती खूपच चांगली आहे. मला आनंद वाटतोय की लोक तिच्यामधील टॅलेंट ओळखू शकत आहेत. मी ऐकले आहे की, पगलैट हा नेटफ्लिक्स वरील चित्रपट खूप चांगली कामगिरी करत आहे. मला तुझ्याबद्दल खूप आनंद वाटतो. तू या सर्व आणि या पेक्षा जास्त गोष्टी  डिजर्व करते. तूला माझ्याकडून खूप प्रेम आणि आशिर्वाद'.

 

सान्याने देखील या कंगनाच्या ट्विटला रिट्विट करून लिहीले 'धन्यवाद, ही खरोखर माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. नेटकऱ्यांनी कंगनाच्या या ट्विटला पसंती दिली आहे. अनेकांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करून लिहीले,' मी तुम्हाला दुसर्‍यांचे कौतुक करताना हे प्रथमच पाहिले आहे'.

 

एका नेटकऱ्याने मात्र कंगानाला टोमणा मारत ट्विट केले ,'धन्यवाद, तू दुसर्‍याचे गुणगान करतेस, अन्यथा तुझ्या दृष्टीने हे सर्व निरुपयोगी आहे.' सान्याचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 31 मार्चला प्रदर्शित झाला आहे.from Manoranjan Feeds https://ift.tt/3uaEQSo

'डिलिवरी झाली, बाळाची आई कामावर आली'; अनुष्काचा व्हॅनिटीतला फोटो व्हायरल

मुंबई - आपल्याकडे सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित वेगवेगळया गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्यात केवळ बॉलीवूडमधील सेलिब्रेटींचा समावेश आहे असे नाही तर क्रिकेटमधील मोठमोठ्या खेळाडूंच्या नावाची चर्चा लहानांपासून मोठ्यांपर्यत रंगलेली असते. विराट आणि अनुष्काला मुलगी झाली त्याची बातमी जेव्हा सोशल मीडियावर प्रसारित झाली होती तेव्हा अनेकांनी त्याला नाकं मुरडली होती. काहींनी त्या दोघांना ट्रोलही केले होते. अर्थात सेलिब्रेटी म्हटल्यावर अशाप्रकारची चर्चा होणारच ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

आता अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण आहे तिचं पुन्हा बॉलीवूडच्या सेटवर परतणं. डिलिव्हरीनंतर अनुष्का पुन्हा कामावर परतली आहे. त्यासंबंधीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याचे काही फोटो ज्यावेळी नेटक-यांनी पाहिले त्यावेळी तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी तिच्यावर टीकाही केली होती. यात काही सांगण्यासारखे आहे का, असा प्रश्न नेटक-यांनी तिला विचारला होता. मात्र आपल्यावर जी टीका झाली आहे त्याविषयी तिनं कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्याचे झाले असे की, काही फोटोग्राफर्सनं अनुष्काचे फोटो काढले. ते सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहेत.

त्या फोटोंमध्ये अनुष्कानं निळ्या रंगाची जीन्स आणि पांढ-या रंगाचे स्वेटर घातले आहे. तसेच कोविडच्या प्रोटेक्शनसाठी मास्कही लावला आहे जानेवारीमध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. तेव्हापासूनच ती आता मोठा ब्रेक घेणार असल्याची चर्चा होती. मात्र त्या चर्चेला अनुष्कानं ब्रेक दिला आहे. ती पुन्हा सेटवर परतली आहे. मोठ्या मॅटर्निटी लिव्हनंतर अनुष्कानं पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार तिनं प्लॅनिंग केले आहे.

आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल अनुष्का अतिशय करड्या स्वभावाची आहे. त्याबाबत तिची मतं ठरलेली आहेत. त्यात कुणी भाग घेतलेला तिला आवडत नाही. नुकताच तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ती व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर पडताना दिसली आहे.  

 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/39vouMe

खलनायकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे जबरदस्त नृत्याविष्कार

‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ४ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता हा रंगारंग सोहळा पाहता येणार आहे. पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याची उत्सुकता आहेच पण त्यासोबतच स्टार प्रवाह परिवारातल्या सदस्यांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस पाहायला मिळणं ही अनोखी पर्वणी असणार आहे. या सोहळ्यात स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये खलनायकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी जबरदस्त नृत्याविष्कार सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध, रंग माझा वेगळा मालिकेतली श्वेता, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी, मुलगी झाली हो मालिकेतले विलास पाटील आणि स्वाभिमान मालिकेतील सुपर्णा सुर्यवंशी यांचा अनोखा अंदाज या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

या अनोख्या नृत्याविष्कारासोबतच स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट मुलगी, सर्वोत्कृष्ट सासू, सर्वोत्कृष्ट खलनायक, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट विनोदवीर, सर्वोत्कृष्ट वहिनी, सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी, सर्वोत्कृष्ट सन्माननीय सदस्य, सर्वोत्कृष्ट रोमॅण्टिक हिरो अश्या वेगवेगळ्या विभागात चुरशीची स्पर्धा असेल. 

हेही वाचा : आता अशी दिसते 'हेरा फेरी'मधली रिंकू; साकारली होती देवीप्रसादच्या नातीची भूमिका

मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे, श्रीरंग गोडबोले, मिलिंद इंगळे या दिग्गजांनी स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष असल्यामुळे सर्वच सदस्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ रविवार ४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. from Manoranjan Feeds https://ift.tt/2PkclCM

रुपेरी पडद्यावर 'फुलराणी' अवतरणार

वर्षभराच्या विरामानंतर आता सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वातही नव्या घडामोडी घडू लागल्या आहेत. आखून दिलेल्या नियमांचे पालन करून मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला वेग आला आहे. होळी आणि रंगपंचमीचा मुहूर्त साधून नुकतीच ‘फुलराणी... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाची घोषणा झाली आहे. ‘पिग्मॅलिअन’वर आधारलेलली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म जगभर चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. एक वेगळी फुलराणी या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ही कलाकृती चित्रपटाच्या रूपात साकारण्याचे काम सध्या जोरात सुरू झालं आहे.

‘फुलराणी’ ही कलाकृती प्रत्येक मराठी मनाच्या अतिशय जवळची आहे. त्यामुळेच मोठ्या पडद्यावरची फुलराणी कोण असणार? नेमकी कशी असणार? याविषयी प्रत्येकालाच कुतूहल आहे. मात्र त्याआधी ‘फुलराणी’ पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज असलेल्या तंत्रज्ञांची नावे नुकतीच एका पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली आहेत.

हेही वाचा : आता अशी दिसते 'हेरा फेरी'मधली रिंकू; साकारली होती देवीप्रसादच्या नातीची भूमिका

‘फुलराणी ... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ या कलाकृतीचे लेखन गुरु ठाकूर व विश्वास जोशी यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, संकलन गुरु पाटील तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे करीत आहेत. सहाय्यक दिग्दर्शक उत्कर्ष जाधव आहेत, रंगभूषा संतोष गायके तर वेशभूषा सायली सोमण यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. मिलिंद शिंगटे आणि आनंद गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. फिनक्राफ्ट मिडिया प्रॉडक्शन या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. उत्तम कलाकार व तंत्रज्ञ यांच्या साथीने फुलराणीचा हा बहर २०२१ ला चित्रपटगृहात दरवळणार असून ही ‘फुलराणी’ प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.from Manoranjan Feeds https://ift.tt/3cAJKCc

'घरच्या परिस्थितीनं मला नोट छापण्याचं मशीन बनवलं'  

मुंबई -  बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे पडद्यावर आले आणि गेले. त्यांचा फारसा प्रभाव प्रेक्षकांवर पडला नाही. त्याचे एक कारण त्यांना मिळालेले चित्रपट, आणि त्या कलाकारांचा अभिनय हे आहे. आता आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत तिनं काही काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं. मात्र त्यानंतर तिला बॉलीवूडला अलविदा करावा लागला. आता ती फारशी लाईमलाईटमध्ये नाही. छोट्या पडद्यावरही ती नाही. त्या अभिनेत्रीचं नाव रिमी सेन असे आहे. तिनं आता सोशल मीडियावर आपल्या प्रवासाविषयी सांगितले आहे. त्यात लहानपणापासूनच कशाप्रकारे आपण नोकरीच्या शोधार्थ भटकत राहिलो असंही तिनं सांगितलं.

बराच काळापासुन बॉलीवूडपासून लांब असणारी रिमी सेन आता तिच्या पर्सनल लाइफविषयीच्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं आपल्या करिअरबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. रिमीनं हंगामा, गोलमाल, धूम, फिर हेरा फेरी, जॉनी गद्दार सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांमुळे ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं असं म्हटलं होतं की, मी जेव्हा लहान होते तेव्हापासूनच माझ्यावर कुटूंबाची जबाबदारी पडली. आणि मग मी कामाला सुरुवात केली. मी कायमच माझ्या परिवारासाठी एक नोट छापायची मशीन बनली होते.

रिमीनं सांगितलं, मी फार विचार करुन चित्रपटाच्या क्षेत्रात आले नव्हते. माझ्या घरची परिस्थितीनं मला ते काम करायला लावले. मुलांचे जेव्हा खेळण्या बागड़ण्याचे वय असते त्या वयात माझ्यावर घरची जबाबदारी आली होती. मला मोठ्या माणसांप्रमाणे काम करावे लागत होते. मी माझ्या आयुष्यात फार संघर्ष केला आहे. मोठ्या कष्टानं आतापर्य़तची वाटचाल केली आहे. फार कमी लोकांना त्याविषयी माहिती आहे. कष्ट केले तेव्हाच माझ्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात का होईना मला आनंददायी दिवस पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याविषयी जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, दहा वर्षांपासून मी चित्रपटांपासून लांब आहे. मला आनंदच होईल जर पुन्हा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर.

बुधिया सिंह - बॉर्न टू विन या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आताही मी काही प्रोजेक्टवर काम करत आहे. ते लवकरच प्रेक्षकांसमोर येतील अशी आशा आहे. जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. असंही रिमी यावेळी म्हणाली. 
 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3cESFmd

गंगुबाईची भूमिका आलियाला दिल्याने दीपिका भन्साळींवर नाराज?

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट ही गंगुबाईंची भूमिका साकारतेय. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता आणि या ट्रेलरमधील आलियाच्या अभिनयाचं फारच कौतुक झालं. मात्र आता आलियाची खास मैत्रीण दीपिका पदुकोण ही दिग्दर्शक भन्साळींवर नाराज झाल्याचं समजतंय. 'स्पॉटबॉय ई'ने दिलेल्या वृत्तानुसार, गंगुबाईच्या भूमिकेची ऑफर न दिल्याने दीपिका भन्साळींवर नाराज झाली आहे. दीपिका ही भन्साळींची सर्वांत आवडती अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं. 'राम लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं.  

चित्रपटातील मुख्य भूमिकेची ऑफर आलियाला दिल्यानंतर भन्साळींनी त्यात दीपिकाला एका गाण्यापुरती झळकण्याची संधी दिली होती असं म्हटलं जातंय. मात्र दीपिकाने या संधीला साफ नकार दिला. विशाल भारद्वाज यांच्या 'सपना दीदी' या चित्रपटात दीपिका महिला गँगस्टरची भूमिका साकारत असल्याने भन्साळींनी तिला गंगुबाईच्या भूमिकेची ऑफर दिलीच नाही, अशी माहिती संजय लीला भन्साळींच्या निकटवर्तीयांनी दिली. दीपिका सध्या शकुन बत्राच्या भूमिकेसाठी तयारी करत आहे. यामध्ये तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धार्थ चतुर्वेदी काम करणार आहेत. तर आलिया 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा : आता अशी दिसते 'हेरा फेरी'मधली रिंकू; साकारली होती देवीप्रसादच्या नातीची भूमिका

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?
दिग्दर्शक भन्साळींना हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातून गंगुबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या कामाठीपुऱ्यात वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या मूळच्या गुजरातच्या होत्या. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी प्रेमविवाह करून त्या मुंबईला पळून आल्या होत्या. मात्र त्यांच्या पतीने केवळ ५०० रुपयांसाठी त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करताना गंगुबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लालाशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधत भाऊ मानलं. त्या घटनेनंतर करीम लालाने अवघा कामाठीपुराच गंगुबाईंच्या हातात दिला, असं म्हटलं जातं. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3wenXbf

आता अशी दिसते 'हेरा फेरी'मधली रिंकू; साकारली होती देवीप्रसादच्या नातीची भूमिका

बॉलिवूडच्या इतिहासातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सर्वांत विनोदी चित्रपटांमध्ये 'हेरा फेरी'चं नाव आवर्जून घेतलं जाईल. श्याम, राजू आणि बाबूराव या त्रिकूटाची धमाल मस्ती आणि मनोरंजनाने ठासून भरलेला हा चित्रपट अनेकांच्याच आवडीचा आहे. २००० साली प्रदर्शित झालेल्या प्रियदर्शनच्या या चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अशीच एक भूमिका होती १० वर्षांच्या रिंकूची. अलेक्सिया अॅनानरा या मुलीने चित्रपटात रिंकूची भूमिका साकारली होती. अॅनानरा आता मोठी झाली असून सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. आता ती अभिनय क्षेत्रापासून फारच लांब असून पर्यावरण सल्लागार म्हणून काम करतेय. 

'हेरा फेरी' या चित्रपटात अॅनानराने देवीप्रसादच्या (कुलभूषण खरबंदा) नातीची भूमिका साकारली होती. चित्रपटात काही गुंड तिचं अपहरण करतात. तीच रिंकू आता तीस वर्षांची झाली असून सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. अॅनानरा अॅनी म्हणूनही ओळखली जाते. 'हेरा फेरी'शिवाय तिने कमल हासनच्या तामिळ चित्रपटातही भूमिका साकारली होती. 'अवई शानमुगी' या चित्रपटात तिने कमल हासनच्या मुलीची भूमिका साकारली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Annie (@annanra)

हेही वाचा : 'तारे जमीन पर' चित्रपटावरून आमिर खानसोबत झालेल्या वादावर १४ वर्षांनंतर अमोल गुप्ते व्यक्त

या दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अॅनीला चित्रपटसृष्टीलाच रामराम केला. अॅनीने बॉलिवूड किंवा अभिनयक्षेत्रात काम केलेलं तिच्या वडिलांना पसंत नव्हतं असं म्हटलं जातं. म्हणूनच तिने पर्यावरण सल्लागार म्हणून काम करण्यास प्राधान्य दिलं. याचसोबत ती एका स्टार्टअपसाठीही काम करतेय. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अॅनीने काही बोल्ड फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. तिने काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारसोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता.  
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3rE4DR2

'तारे जमीन पर' चित्रपटावरून आमिर खानसोबत झालेल्या वादावर १४ वर्षांनंतर अमोल गुप्ते व्यक्त

लहान मुलांवर शिक्षणाविषयी टाकल्या जाणाऱ्या दबावावर भाष्ट करणारा 'तारे जमीन पर' हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. यामध्ये आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीच दिग्दर्शक अमोल गुप्ते आणि आमिर खान यांच्यात श्रेयवाद झाला होता. हाच वाद आता तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इतक्या वर्षांनंतर अमोल गुप्ते हे आमिर खानसोबत झालेल्या वादावर व्यक्त झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी श्रेयवादावर भाष्य केलं. त्या घटनेतून मी आता खूप पुढे आलो आहे, असं ते म्हणाले. 

काय होता वाद?
'तारे जमीन पर' या चित्रपटाचे मूळ दिग्दर्शक अमोल गुप्ते होते. मात्र काही मतभेदांमुळे आमिर खानने अर्ध्यावरून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आमिर खानचं नाव दिग्दर्शक म्हणून देण्यात आलं. तर अमोल गुप्तेंना लेखक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टरवर समाधान मानावं लागलं. 

काय म्हणाले अमोल गुप्ते?
"मित्रा, वेळ एका ठिकाणी थांबत नाही आणि तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही कारण सूर्यास्तानंतर सुर्योदय होतोच. मला आता त्या गोष्टीचा अजिबात त्रास होत नाही. मी सतत दु:खात बुडून बसणारा व्यक्ती नाही. आलेला प्रत्येक दिवस मी आव्हान म्हणून स्वीकारतो. त्यामुळेच मी सिनेमाला शिकू शकलो. आता त्या घटनेला १४ वर्षे झाली आहेत", असं ते 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

हेही वाचा : "किसिंग सीनला तुझा नकार का?"; ऐश्वर्याला विचारलेल्या प्रश्नावर अभिषेकने दिलं मजेशीर उत्तर

आमिरशी पंगा घेतल्याने बॉलिवूडमधील इतर कलाकरांनी चुकीची वागणूक दिली का असा प्रश्न विचारला असता ते पुढे म्हणाले, "ते तर होतंच राहतं आणि पुढेही होत राहणार. गोलियाथसोबत उभं राहायला कोण नाही म्हणणार आणि डेव्हिडच्या पाठिशी कोण उभं राहणार? पण ठीक आहे. तुमचं युद्ध जिंकण्यासाठी तुम्हालाच गुरुला युद्धपद्धती अवलंबावी लागेल. माझं देणं फक्त सिनेमालाच आहे, आणखी कोणालाच नाही."

'तारे जमीन पर' या चित्रपटात आठ वर्षांच्या डिस्लेक्सिया असलेल्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले होते. from Manoranjan Feeds https://ift.tt/3ftWaNW

पत्नीचा गर्भपात, डिप्रेशनमुळे घेत होती गोळ्या; NCB कडून अटकेनंतर एजाजची प्रतिक्रिया

ड्रग्ज प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता एजाज खानला मंगळवारी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं. एजाज राजस्थानहून मुंबईला परतत असताना एनसीबीने ही कारवाई केली. आठ तास त्याची चौकशी केल्यानंतर एनसीबीने एजाजला अटक केली आहे. एनसीबीची टीम एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला इथल्या घरांवर छापेमारीची कारवाई करत आहे. याआधी एनसीबीने ड्रग्जची तस्करी करणाऱ्या शादाब बटाटाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याच्या चौकशीदरम्यान एजाजचं नाव समोर आलं. ड्रग्ज प्रकरणी एजाजचं नाव याआधीही समोर आलं होतं. 

एजाजचं स्पष्टीकरण
"माझ्या घरात चार झोपेच्या गोळ्या आढळल्या आहेत. माझ्या पत्नीचा गर्भपात झाला होता आणि झोपेच्या गोळ्या ती नैराश्यावर मात करण्यासाठी घेत आहे", असं स्पष्टीकरण एजाजने दिलं. 

आठ तासांची सखोल चौकशी
ड्रग पेडलर शादाब बटाटाने चौकशीदरम्यान एजाजचा उल्लेख केला. त्यावरून एनसीबीने एजाजला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने अटकेची कारवाई केली. आता एनसीबी एजाजच्या कस्टडीची मागणी करू शकते. त्यामुळे कोर्टात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

२०१८ मध्येही केली होती अटक
२०१८ मध्ये एजाजला नवी मुंबईच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने मुंबईच्या एका हॉटेलमधून अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे आठ अमलीपदार्थाच्या गोळ्या आढळल्या होत्या. बंदी असलेल्या अंमलीपदार्थांचा साठा आढळल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. 

हेही वाचा : प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; दोन दिवसांत येणारं होतं नवीन गाणं

फेसबुक पोस्टमुळेही होता चर्चेत
एजाज खान याआधी फेसबुकवर एक वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे चर्चेत होता. त्या व्हिडीओप्रकरणी एजाजला अटकसुद्धा करण्यात आली होती. एजाजने 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3cyq0z4

"किसिंग सीनला तुझा नकार का?"; ऐश्वर्याला विचारलेल्या प्रश्नावर अभिषेकने दिलं मजेशीर उत्तर

प्रसिद्ध अमेरिकन सूत्रसंचालक ओप्रा विन्फ्रेनं नुकतीच 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची मुलाखत घेतली. ही मुलाखत सर्वत्र चांगलीच चर्चेत होती. याआधीही ओप्राने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत. २००९ मध्ये तिने ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या जोडीची मुलाखत घेतली होती. २००७ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि त्यावेळी ही जोडी खूप चर्चेत होती. लग्नापूर्वीही अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र चित्रपटांत काम केलं होतं. यावेळी मुलाखतीत ओप्राने ऐश्वर्याला 'नो किसिंग रुल'वरून प्रश्न विचारला. इतकं यशस्वी करिअर असताना, हॉलिवूडमध्येही ओळख प्रस्थापित केली असतानाही पडद्यावर 'नो किसिंग'चा नियम का, असा प्रश्न ओप्राने तिला विचारला होता. यावर ऐश्वर्या काही बोलण्याआधीच अभिषेकने तिला उत्तर दिलं. 

ओप्राचा प्रश्न ऐकून ऐश्वर्या सुरुवातीला हसली आणि तितक्यात अभिषेकने तिला गालावर किस केलं. हे पाहून उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. अभिषेक पुढे म्हणाला, "भारतात कॅमेरासमोर उघडपणे बऱ्याच गोष्टी दाखवल्या जात नाही, जितक्या पाश्चिमात्य देशांमध्ये दाखवल्या जातात. त्या गोष्टींना  लोक स्वीकारतीला का असा प्रश्न नाहीये, तर त्या गोष्टींची गरजच आम्हाला नाही. अनेक भारतीय प्रेक्षकांना असं वाटतं की ती गोष्ट पडद्यावर दाखवणं गरजेचं नाही. जर एखाद्या दृश्यात मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले असतील आणि त्यांना ते प्रेम व्यक्त करायचं असेल किंवा किस करायचं असेल तर भारतात आम्ही तिथे गाण्याचा प्रभावी वापर करतो."

हेही वाचा : बॉबी, ऐश्वर्याला कित्येक वर्षांपूर्वी होती कोरोनाची माहिती; भन्नाट मीम्स व्हायरल

अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज कसं केलं, असा प्रश्नही तिने या मुलाखतीत विचारला. "मी न्यूयॉर्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. माझ्या हॉटेल रुममधील बाल्कनी मला खूपच आवडली होती आणि ती तिथे असती तर तिला लग्नासाठी नक्कीच विचारलं असतं असा प्रश्न मनात आला. नंतर मी तिला त्याच हॉटेल रुममधील बाल्कनीमध्ये नेलं आणि लग्नासाठी प्रपोज केलं", असं अभिषेकने सांगितलं. अभिषेक- ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे.
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3m7xhci

पवन कल्याणचा 'वकील साब' ट्रेलर आऊट; पिंकचा रिमेक

मुंबई-  सोशल मीडियावर वकील साबच्या ट्रेलरची मोठी हवा आहे. बॉलीवूडमधल्या पिंक चित्रपटाचा रिमेक असणा-या या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तो ट्रेलर अनेकांच्या पसंतीस पडला आहे. पावर स्टार पवन कल्याण हा ब-याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचा नवीन चित्रपट वकील साब. हा चित्रपट लोकप्रिय चित्रपट पिंकचा रिमेक असल्याची चर्चा आहे. पिंक या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. आता पवनच्या या नव्या चित्रपटाविषयीचे कुतूहल वाढले आहे. पवनचे फॅन्स भलतेच उत्सुकही आहेत. मंगळवारी वकील साब चा ट्रेलर हा सोशल मीडियावर ट्रेडिंग असणारा विषय होता. 'पावर स्टर' पवन कल्याण हे खूप कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर परत येणार आहेत. या चित्रपटबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

पवन कुमार यांचा वकिल सहाब हा  प्रसिध्द बॅालिवूड चित्रपट पिंक चा अॅाफिशल तेलगू रिमेक आहे. या चित्रपटात पवण कल्याण यांच्या सोबत अंजली, निवेश थॅामस, अनन्या आणि प्रकाश राज सारखी तगडी स्टार कास्ट दिसणार आहे. पिंकमध्ये अमिताभ  बच्चन आणि तापसि पन्नूच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता वकिल सहाब हा चित्रपट पिंक प्रमाणेच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल का हे लवकरच समजेल. वकिल सहाब हा चित्रपट वेणू श्रीराम यांनी दिग्दर्शित केला आहे. दिल राजू आणि बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.     

'आई माझी काळुबाई' मालिकेत नवा बदल; आर्याच्या भूमिकेत नवा चेहरा

वकिल सहाब या चित्रपटामधील संवाद हे अतिशय उत्कृष्ट आहेत.  या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यामधील संवादाची ताकद तुम्हाला लक्षात येईल. हे डायलॅाग प्रेक्षकांना थेटरमध्ये शिट्टया वाजवायला नक्कीच भाग पाडतील. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका सिनमध्ये पवन कल्याण एका मुलाला म्हणतात, 'र यू ए वर्जिन' या डायलॅागने सध्या सोशल मिडीयावर धूमाकूळ घातला आहे. 

पवन कल्याण यांनी त्यांच्या करियरची सुरूवात 1999 रोजी 'अक्कदा अम्माई इक्कादा अब्बाई' या चित्रपटामधून केली. त्यानंतर त्यांनी ‘गोकुलम्लो  सीता’, ‘सुसवाथम’, और ‘थोली प्रेमा’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. 2018 मध्ये त्यांनी अग्न्याथवासी या चित्रपटामध्ये काम केले. त्यानंतर बरेच काळ कोण्याच चित्रपटात काम केले नाही. आता ते वकिल सहाब या चित्रपटामधून पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.from Manoranjan Feeds https://ift.tt/2Pk5OYT

कोरोनाचा उद्रेक! माधुरी दीक्षितच्या 'डान्स दिवाने'च्या सेटवरील १८ जण पॉझिटिव्ह

'डान्स दिवाने' या डान्स रिअॅलिटी शोच्या १८ क्रू मेंबर्सना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोरेगावमधील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये या शोची शूटिंग सुरू होती. सेटवरील १८ क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे हे तिघेजण या शोचे परीक्षक आहेत. तर राघव जुयाल या शोचं सूत्रसंचालन करतो. 'ई टाइम्स टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, शूटिंग बंद पडू नये म्हणून या शोचे निर्माते अरविंद राव यांनी ताबडतोब इतर १८ जणांची सेटवरील कामासाठी नियुक्ती केली आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉइजचे सचिव अशोक दुबे याविषयी म्हणाले, "ही अत्यंत गंभीर बाब आहे. सेटवरील ज्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. या शोमध्ये काम करणाऱ्यांची आधी कोरोना चाचणी केली जाते. पुढील शूटिंग ५ एप्रिल रोजी असल्याने नवीन लोकांना कामावर घेता येईल. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या क्रू मेंबर्सनाच काम करण्याची परवानगी देण्यात येईल."

हेही वाचा : 'सर्वतोपरी काळजी घेऊनही टेस्ट पॉझिटिव्ह'; सलील कुलकर्णींना कोरोना

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कलाविश्वातील अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आमिर खान, आर. माधवन, विक्रांत मेस्सी, रोहित सराफ, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली. राज्यात सोमवारी ३१,६४३ बाधितांची नोंद झाली. तर गेल्या सहा दिवसांमध्ये राज्यात दोन लाखांच्या आसपास नव्या रुग्णांचे निदान झाले. राज्यात रविवारी उच्चांकी ४०,४१४ नवे रुग्ण आढळले होते. तर गेल्या २४ तासांत १०८ जणांचा मृत्यू झाला.from Manoranjan Feeds https://ift.tt/2QUFwgt

पिऊन आलाय का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर इरफानच्या मुलाची खतरनाक पोस्ट

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलने नुकतच सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण बाबिलने या पोस्टमधून पत्रकारांवर भाष्य केले आहे. नुकताच दिवंगत अभिनेता इरफान खान यांना दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. अंग्रेजी मिडीयम या चित्रपटासाठी प्रमुख भूमिका सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार इरफानला देण्यात आला. यावेळी बाबिलने इरफान यांचे कपडे परिधान केले होते. यावेळी वडिलांच्या आठवणीत बाबिल भावूक झाला.
  
फिल्मफेअर पुरस्कारावेळी घडलेल्या घटनेसंबंधीत एक पोस्ट बाबिलने सोशल मिडीयावर शेअर केली. पुरस्कार सोहळा जेव्हा पार पडत होता. तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या काही पत्रकारांनी बाबिला असा काही प्रश्न विचारला की, बाबिलाची तळ पायाची आग मस्तकात गेली. त्यानं त्याचा राग सोशल मीडियावर व्यक्त केला. बाबिलंन इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. त्यामध्ये त्याने पुरस्कार सोहळ्यात घडलेला प्रकार नेटकऱ्यांसोबत शेअर केला. 

बाबिलने पोस्टमध्ये लिहीले की, 'मला तुम्हा सर्वांना एका प्रसंगाबद्दल सांगायचं आहे. मी नुकतीच फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या सोहळ्यादरम्यान तिथं असलेल्या सात पत्रकारांनी मला पिऊन आलाय का? असा प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे माझे डोळे. माझा लुक. भारीच हा मित्रांनो, खूपच चांगला शोध लावला तुम्ही. युनिव्हसिटी सोडली तेव्हापासून मी पूर्णपणे नॅचरल आहे. माझा हा नॅचरल लुक तुम्हाला नशेत असल्यासारखा वाटतोय, हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! हाच माझा चेहरा आता मी बॉलिवूडमध्ये वापरून कोट्यवधी रुपये कमवणार आहे'. या पोस्टमुळे बाबिल चर्चेत आला आहे. त्याच्या डोळ्यामुळे आणि कपड्यांमुळे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बाबिलने दिलेले उत्तर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडले.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी इरफानचे कपडे घालून आवरत असतानाचा आपल्या आईसोबतचा व्हिडीओ बाबिलने सोशल मिडीयावर पोस्ट केला.   

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

नुकताच बाबिलने खुलासा केला की, त्याला त्याच्या वडिलांसारख अभिनेता व्हायचं आहे. सध्या बाबिल त्याचा भाऊ अयानसोबत एका म्युझिक अल्बमवर काम करत आहे. पण यासोबत त्याला वडिलांची अभिनयाची परंपरासुद्धा पुढे न्यायची आहे. काही दिवसांपूर्वी बाबिलने इरफान यांच्या एका डायरीचा व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये इरफानने बाबिलसाठी लिहिलेले काही अभिनयाचे टिप्स होते.from Manoranjan Feeds https://ift.tt/3frDcYc