Power Bank ||Best Earning App 2021Army Of The Dead Trailer व्हायरल : हुमाचा कडक लूक पाहाच! 

मुंबई - कोरोनाचा विळखा घट्ट होत असला तरी मनोरंजन क्षेत्रात चित्रपट आणि मालिकांमधील घडामोडी सुरुच आहेत. वास्तविक गेल्या महिनाभरापासून कोरोनानं मनोरंजन क्षेत्राला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्याचा परिणाम दिसून आला आहे. गेल्या वर्षांपासून रखडलेल्या काही चित्रपट आणि मालिकांचे प्रदर्शन कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचा परिणाम निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर झाला आहे. दोन आठवड्यांपासून वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखाही प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र आता सगळे लक्ष कोरोनाकडे लागले आहे. अशातच प्रसिध्द अभिनेत्री हुमा कुरेशीचा आर्मी ऑफ द डेड या हॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याला नेटक-यांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ब-याच काळानंतर हुमा कुरेशी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

जॅक स्नायडर याची झॉम्बी फिल्म ' आर्मी ऑफ द डेड' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हुमा कुरेशी ही बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्या ट्रेलरमधील हुमाचा लूक सर्वांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. गेल्या वर्षी तिची लैला नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्यात तिनं मुख्य भूमिका साकारली होती. आर्मी ऑफ द डेड मध्ये तिनं गीताची भूमिका साकारली आहे. त्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते की, डेव बॉतिस्टानं लास वेगासमधून दोनशे मिलियन डॉलर लुटण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यानिमित्तानं लास वेगासमध्ये काही महिला आणि पुरुष येत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

चित्रपटात जॉबी नावाची एक फौजही दाखविण्यात आली आहे. त्यात झॉम्बीचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. त्या ट्रेलरमध्ये हुमाचा एक वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. 2004 मध्ये आलेल्या डॉन ऑफ द डेड या चित्रपटाचा आर्मी ऑफ द डेड हा सीक्वेल आहे. त्या चित्रपटाची निर्मितीही जॅक स्नायडरनं केली होती. आणि आताचा भागही तोच बनवणार आहे. या चित्रपटानंतर हॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात झॉम्बी मुव्हीज तयार व्हायला सुरुवात झाली.

 हुमाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती लवरकच अक्षय कुमार बरोबर बेलबॉटम या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसेन दिसणार आहे. हुमाचा आर्मी ऑफ द डेडमध्येही महत्वाचा लूक आहे. 

 from Manoranjan Feeds https://ift.tt/2RyzimG

आई होण्यापेक्षा करिअरला दिलं महत्व; बारा वर्षानंतर घेतला 'चान्स' 

मुंबई -  टेलिव्हिजनवर ९० च्या दशकात प्रसिध्द झालेल्या शांती या मालिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याला कारणही तसचं होतं. त्या मालिकेमध्ये काम करणा-या मंदिरा बेदी नावाच्या अभिनेत्रीनं आपल्या नावाचा ठसा भूमिकेच्या माध्यमातून उमटवला होता. 15 एप्रिल हा तिचा जन्मदिवस आहे. मंदिराचा चित्रपटांमध्ये फारसा जीव रमला नाही. त्यामुळे ती छोट्या पडद्यावर रमली. तिथून तिची लोकप्रियता वाढली. गेल्या वर्षी तिनं थिंकिस्तान नावाच्या वेबसीरिजमध्ये काम केले होते. त्यात तिच्या भूमिकेची विशेष चर्चा झाली. एका जाहिरात एजन्सीमध्ये क्रिएटीव्ह हेडची भूमिका मंदिरानं त्यात साकारली होती. सर्वात प्रथम करिअरकडे लक्ष देणारी अभिनेत्री म्हणूनही मंदिराचा उल्लेख करावा लागेल. त्यासाठी तिनं आपल्या मातृत्वालाही नाकारलं होतं. जन्मदिनाच्या निमित्तानं जाणून घेऊयात मंदिराचा प्रवास.

1994 मध्ये दुरदर्शनवर शांती नावाची मालिका आली होती. त्यात मंदिरानं जबरदस्त काम केले  होते. तेव्हापासून तिच्यातील अभिनयाला पैलू पडण्यास सुरुवात झाली होती. कुठल्याही साच्यात अडकून न पडता नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्यास तिनं प्राधान्य दिले होते. क्रिकेटमध्ये समालोचन करुन वेगळा ठसा उमटवला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींविषयी खुलासा केला आहे. तिनं सांगितलं आहे की, मी 12 वर्षे मातृत्वापासून लांब राहिले त्याचे कारण करिअर हेच होते. वयाच्या विशीपासून मी मनोरंजन क्षेत्रात आहे. तेव्हापासून मी माझ्या ताकदीवर करिअर केले. 30 व्या वर्षी मी स्वतला असुरक्षित समजत होते. आता 40 असताना मला खुप छान वाटत आहे.

12 वर्षानंतर आई झाल्यानंतर कसे वाटले या प्रश्नावर मंदिरानं सांगितलं की, मी 2011 मध्ये मुलाला जन्म दिला. त्यावेळी मी 39 वर्षांची होते. मला नेहमी भीती वाटायची की जर मी प्रेग्नेंट झाले तर माझे करिअर संपून जाईल. कारण मनोरंजन क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे. त्यातील राजकारणाविषयी मला चांगले माहिती होते. त्यामुळे मी सावध होते. मला माझ्या जबाबदारीची जाणीवही होती. मात्र योग्य त्यावेळी काय करावे असा प्रश्न माझ्यापुढे होता. यासगळ्या निर्णयासाठी मला माझ्या पतीच्या सल्ल्याची गरज होती. त्याच्याशिवाय आमच्यातील नातं योग्य प्रकारे चालणार नव्हतं. 

माधुरीची ब्युटी, नोराचा तोरा, मेरा पिया घर आया वर थिरकल्या 'डान्सिंग क्वीन'

हेही वाचा : मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

1999 मध्ये मंदिरानं दिग्दर्शक राज कौशल यांच्याशी लग्न केलं. मुलाखतीत मंदिरानं सांगितलं, मनोरंजन क्षेत्रात महिलांचा प्रवास हा फार काळ चालत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. मला नेहमी त्याच गोष्टीची भीती वाटायची. चित्रपट आणि मालिकांमध्ये बराच काळ काम करणा-या कलाकारांमध्ये कालांतरानं असुरक्षितपणाची भावना येऊ लागते. मंदिरानं 1995 मध्ये दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधून अभिनेत्री म्हणून सुरुवात केली होती. 

 
 
 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/2RDr1xX

अपरिचितच्या हिंदी रिमेकमध्ये रणवीर साकारणार प्रमुख भूमिका

मुंबई : प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच चित्रपटांमध्ये चॅलेंजिंग भूमिका करत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. चित्रपटांमधील अभिनयामुळे रणवीरचा चाहता वर्ग मोठा आहे. साऊथ चित्रपटसृष्टीतील टेम्पर चित्रपटाचा रिमेक सिंम्बामध्ये रणवीर सिंगने काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगणने या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केले. टेम्पर चित्रपटातीमध्ये प्रमुख भूमिका अभिनेता ज्युनियर एन टी आर यांनी केली होती. 

'एक नारळ दिलाय दर्या देवाला..'; पहा रितेशचा भन्नाट डान्स 

सिम्बानंतर आता रणवीर आणखी एका साऊथ चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ सुपर हिट चित्रपट 'अनियन' चा हिंदीमध्ये डब केलेला हिंदी चित्रपट म्हणजेच 'अपरिचित'चा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अपरिचित चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका अभिनेता विक्रम यांनी केली आहे. अपरिचित चित्रपट प्रदर्शित होऊन 15 वर्षे झाली पण विक्रम यांचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांच्या आजही पसंतीस पडतो. आता विक्रम यांच्यासारखा प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा अभिनय रणवीर चित्रपटात साकारू शकेल की नाही याची उस्तुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. 

 

रणवीरने नुकताच सोशल मीडियावर दिग्दर्शक, लेखक एस शंकर आणि जयंतीलाल गडा यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला रणवीरने कॅप्शन दिले, 'शंकर सरांच्या चित्रपटाचा एक भाग होण्याची मला संधी मला मिळाली याची मला धन्यता वाटते.'from Manoranjan Feeds https://ift.tt/3gbgpk2

माधुरीची ब्युटी, नोराचा तोरा, मेरा पिया घर आया वर थिरकल्या 'डान्सिंग क्वीन' 

मुंबई -  बॉलीवूडमधील सर्वात भारी डान्सर कोण यावर कोणीही बिनधास्तपणे उत्तर देईल की माधुरीच. मात्र आता ती आता बॉलीवूडपासून लांब गेली आहे. ती आता डान्सिंग शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते. सध्या तरुणाईमध्ये नोरा फतेहीची मोठी क्रेझ आहे. तिच्या हटके डान्सिंग स्टाईलवर सगळे फिदा आहेत. या दोन्ही डान्सिंग स्टार एकत्र डान्स करताना दिसल्या तर, माधुरीला डान्सिंग दिवा असे म्हटले जाते. एका शो मध्ये माधुरी आणि नोरानं एकत्रित डान्स केला. तेव्हा त्या दोघींच्या परफॉर्मन्सनं सगळ्यांना चकित केलं. आणि उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. टेलिव्हिजनवर प्रसिध्द असणारा डान्स दिवाने च्या तिस-या सीझनमधील एका भागात त्या टेलिकास्टला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

नोरा डान्स दिवाने च्या 3 सीझनमध्ये पाहुणी कलाकार म्हणून नोरा फतेही आली होती. त्यावेळी माधुरी आणि तिनं मेरा पिया घर आया या गाण्यावर डान्स केला. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला. त्या गाण्याचा व्हिडिओ माधुरीनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला. तो सध्या कमालीच्या वेगानं व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ट्रेंडिगचा विषय म्हणूनही त्याला सर्वजण पसंत करत आहे. माधुरी स्वताही नोराच्या डान्सची फॅन आहे. तिची डान्सिंग स्टाईल सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. ज्यावेळी त्या दोघींनी डान्सला सुरुवात केली त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या सेटवर एक वेगळाच माहौल तयार झाला होता. प्रेक्षकांनीही त्या दोघींच्या परफॉर्मन्सचं कौतूक केलं.

माधुरीनं इंस्टावर त्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती आणि नोरा डान्स करत आहेत. दोघींच्या फॅन्सनं त्या व्हिडिओला पसंती दिली आहे. लाईक्स आणि कमेंटसही दिल्या आहेत. मेरा पिया घर आया हे माधुरीचं हिट गाणं आहे. आजही प्रेक्षकांच्या मनात माधुरीनं त्या गाण्यावर केलेल्या डान्सच्या आठवणी ताज्या आहेत. सध्या या शो चा एक ट्रेलर व्हायरल होत आहे. आता हा एपिसोड कधी टेलिकास्ट होतो याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. सध्या वाढत्या कोरोनाचा फटका डान्स दिवानेच्या 3 सीझनमध्ये बसला होता. त्या मालिकेतील जज धर्मेश याच्याबरोबर आणखी 3 जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

 
 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3as5jDF

करिनाचे अजब डोहाळे; सैफ झाला होता चकीत! 

अभिनेत्री करिना कपूर खानने दुसऱ्या बाळंतपणानंतर पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे. करिना लवकरच 'स्टार व्हर्सेस फूड' या शोमध्ये झळकणार आहे. या शोमध्ये ती प्रसिद्ध शेफसोबत विविध पदार्थ बनवणार आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी करिनाने प्रसिद्धीसाठी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पती सैफ अली खान, मुलगा तैमुर यांच्या सवयींबद्दल, गरोदरपणातील तिच्या डोहाळ्यांबद्दल, खान कुटुंबीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल सांगितलं. तैमुर आणि सैफला किचनमध्ये विविध पदार्थ बनवण्याची फार आवड आहे, असं करिना म्हणाली. सैफ तैमुरसोबत किचनमध्ये असताना करिनाला गाणी लावण्याचं काम दिलं जातं, असंही तिने सांगितलं. 

"तैमुर आणि सैफला विविध पदार्थ बनवायला फार आवडतं. त्यांना किचनमध्ये पदार्थांसोबत विविध प्रयोग करायला आवडतात आणि त्यावेळी मला गाणी लावण्याचं काम दिलं जातं. दोघांनाही किचनमध्ये काम करताना जॅझ म्युझिक ऐकायला फार आवडतं", असं ती 'इंडियन एक्स्प्रेस' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. काही दिवसांपूर्वीच करिनाने तैमुरने बनवलेल्या कुकीजचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.  

"मला वाटतं लॉकडाउनमध्ये सर्वचजण बनाना ब्रेड बनवत होते. मी ते कधीच नाही बनवलं, पण सैफचे किचनमध्ये विविध प्रयोग सुरूच होते", असं ती पुढे म्हणाली. यावेळी दुसऱ्या गरोदरपणात कोणत्या पदार्थांचे डोहाळे लागले होते, हेसुद्धा तिने सांगितलं. "मला त्यावेळी सतत पिझ्झा आणि पास्ता खावंसं वाटतं होतं. इटालियन पदार्थांचे डोहाळे मला लागले होते आणि ते पाहून सैफसुद्धा चकीत झाला होता", असं ती म्हणाली. 

हेही वाचा : मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

खान कुटुंबाच्या जेवणाच्या सवयीबद्दल तिने सांगितलं, "आम्ही जेव्हा जेव्हा जेवायला बसतो, तेव्हा एका जुन्या इटालियन कुटुंबात असल्यासारखं मला वाटतं. डायनिंग टेबलवर एक वेगळाच आनंद, उत्साह असतो. आम्ही सर्वचजण खाण्याचे शौकीन आहोत." करिनाच्या या आगामी शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या शोमध्ये करिना पिझ्झासुद्धा बनवणार आहे. from Manoranjan Feeds https://ift.tt/3mSETQf

व्हॅक्सिन घेऊनही आशुतोष राणाला झाला कोरोना

मुंबई - देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींना कोरोनानं आपल्या विळख्यात घेतलं आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यातील मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी शासनानं प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आता बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता आशुतोष राणा याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याविषयी सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. येत्या काळात कोरोनाचा उद्रेक आणखी वाढणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी य़ावेळी केले आहे.

राणा यांनी सांगितले की, सहा एप्रिलला मी कोरोनाचे व्हॅक्सिन घेतलं होतं. तरीही मला कोरोना झाला आहे. मी आणि पत्नीनं कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलं होतं. त्यावेळी राणा यांची पत्नी रेणूका शहाणे यांनीही व्हॅक्सिनेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. राणा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, आजपासून भारतीय नववर्षाला प्रारंभ होत आहे. यावेळी दुर्गा मातेचे स्मरण केले जाईल. मात्र आजच्या अशा शुभ दिवशी मला कोरोना झाल्याचे कळले. त्यावेळी वाईट वाटले. आपल्याला काय झाले आहे याची वेळेवर माहिती मिळणे यासारखा शुभ योगायोग नाही.

ज्यावेळी मला कळले की कोरोना झाला आहे त्यानंतर मी या आजारातून मुक्त कसे व्हायचे याचा विचार करु लागलो. त्यावेळी मला माझ्या गुरुजींची आठवण झाली. मी आता माझ्या संपूर्ण परिवाराची टेस्ट केली आहे. त्या सगळ्यांचा रिपोर्ट उद्या येणार आहे. मात्र माझ्या संपर्कात आलेल्या सर्व मित्रांनी आपली टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन राणा यांनी केले आहे. यापूर्वी अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट्ट आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. 

 from Manoranjan Feeds https://ift.tt/3dZNDQt

रामदेवबाबा संन्यास घेण्यामागचं कारण माहितीये का? जाणून घ्या त्यांच्याकडून..

 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे इंडियन आयडॉल. सध्या या शोचं १२ वं पर्व सुरु असून आतापर्यंत या मंचावर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अलिकडेच झालेल्या भागात योगगुरू रामदेव बाबा यांनी या शोच्या मंचावर हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या शोमध्ये त्यांनी त्यांच्या आध्यात्म  आणि संन्यास घेण्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. या भागाचा एक प्रोमो सध्या चर्चेत आला आहे. 

"२७ वर्षांपूर्वी रामनवमीच्या दिवशी मी माझं जीवन साधेपणाने जगण्याचा आणि सुखसुविधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. रामनवमीच्या दिवशी एकप्रकारे माझा नव्याने जन्म झाला. या दिवसापासून मी साधे आणि सात्विक जीवन जगू लागलो", असं रामदेव बाबा म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "या मंचावर गाणी सादर करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे. या सगळ्याचे आवाज इतके सुमधूर आहेत, जे ऐकून माज्या अंगावर शहारे आले."

दरम्यान, आतापर्यंत या मंचावर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेखा, नीतू सिंग अशा लोकप्रिय अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3decIrU

'कलाकारांची मतं कधीपासून इतकी महत्त्वाची ठरली?'; समंथाचा सवाल

देशातील महत्त्वपूर्ण विषयांवर कलाकार मतं मांडत नसल्याची टीका करणाऱ्या माधम्यांना दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने टोला लगावला आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक उपरोधिक व्हिडीओ पोस्ट केल आहे. त्यात तिने माध्यमांना टोला लगावला आहे. व्हिडीओत तिने म्हटलंय, 'ते : या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचंय. मी : कधीपासून आम्हा कलाकारांची मतं इतकी महत्त्वाची ठरली?' या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने सविस्तरपणे हा विषय मांडला आहे. 

काय म्हणाली समंथा?
'आम्ही करमणूक करणारे आहोत, फॅक्ट चेकर्स नाही. जगाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींवर मतं मांडण्यासाठी कलाकारांना का जबाबदार ठरवलं जातं? आम्हीसुद्धा माणूस आहो आणि आम्हीसुद्धा चुकतो. पण प्रत्येक विषयावर आम्ही बोलत नाही म्हणून किंवा खूपच बोलतो म्हणून आमच्यावर टीका करणं चुकीचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? आम्ही जे काम चांगलं करतो तेच आम्हाला करू द्या', अशा शब्दांत समंथाने माध्यमांना सुनावलं. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी लाइक केलं असून तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. यामी गौतम, प्रग्या जैस्वाल, विमला रमण यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना राणावतचा 'थलायवी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. समंथाने सोशल मीडियावर या ट्रेलरचं आणि कंगनाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. याआधी २०१९ मध्येही समंथाने कंगनाच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचीही स्तुती केली होती. 

हेही वाचा : मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

समंथा लवकरच 'शाकुंतलम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गुणशेखरने केलं असून निलिमा गुणा आणि दिल राजू हे निर्माते आहे. त्यानंतर 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती झळकणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून समंथा वेब विश्वात पदार्पण करत आहे. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/2RBpxnJ

'एक नाराळ दिलाय दर्या देवाला..'; पहा रितेशचा भन्नाट डान्स

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सध्या एक नारळ दिलाय दर्या देवाला हे गाण सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. नेटकरी या गाण्यावर लिप्सिंग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

आमच्यासाठी कोरोना आणि करीनासुद्धा; आमिर खान झाला ट्रोल

नुकताच या गाण्याचा व्हिडीओ रितेशने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर जो ट्रेण्ड सुरु असतो तो रितेश नेहमी फाॅलो करतो. त्याने  एक नारळ दिलाय दर्या देवाला हे गाणे ऐकले आणि त्या गाण्यावर व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करून रितेशने त्याला कॅप्शन दिले, ' या गाण्याच्या मी प्रेमात पडलोय. नारळ पाणी बाय, धृवन मोर्थी आणि प्रित बेर्डे.' या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून अनेक जणांनी कमेंट केल्या आहेत.

 

धृवन मोर्थी आणि प्रित बेर्डे या संगितकारांनी तयार केले. हे गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रितेश नेहमी नवोदित कलाकारांचे कौतुक करत असतो. या संगितकारांचे देखील त्याने कौतुक करत हा व्हिडीओ शेअर केला. संगितकार प्रित बेर्डेने रितेशचा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.  

स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधीच्या पत्निचे आयुष्य खडतर ; सांगितला अनुभव 

'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनिलीया आणि रितेशची ओळख झाली. जेनिलीया आणि रितेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 ला लग्न केले. जेनिलीया आणि रितेशला राहिल आणि रियान नावाचे दोन मुलं आहेत. धमाल , हाऊस फूल, बाघी 3, एक व्हिलन या हिट चित्रपटांमधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच माऊली आणि लय भारी या मराठी चित्रपटामधून रितेशने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.from Manoranjan Feeds https://ift.tt/3e0aKdF

आमच्यासाठी कोरोना आणि करीनासुद्धा; आमिर खान झाला ट्रोल

मुंबई : अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूरचा एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत ते दोघे लाल सिंग चढ्ढा या त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना माहिती देत होते. आमिरचा चाहता वर्ग मोठा आहे. एका चाहत्यांने त्याच्या युट्यूब चॅनलवर या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. 

बाळंतपणानंतर वाढलेले वजन कसे कमी करायचे? वाचा अनुष्काच्या न्युट्रीशियनच्या टिप्स

मुलाखतीमध्ये आमिरची पत्नी किरण राव देखील सहभागी झाली होती. या व्हिडीओमध्ये आमिर म्हणतो,' जर परिस्थिती ठीक असेल, आम्ही ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत गेल्या. तर या वर्षीच्या अखेरपर्यंत चित्रपट प्रदर्शित होईल'. त्यानंतर किरण म्हणते, 'ख्रिसमस दरम्यान'. कोरोना महामारीच्या दरम्यान या चित्रपटाच्या शुटिंगचे नियोजन केले होते. शुटिंगबाबत बोलताना आमीर म्हणाला, 'या काळात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यात करीनाने आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आमच्यासाठी परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. तिच्या गरोदरपणामुळे आम्हाला अधिक खबरदारी घेऊन चित्रीकरण करणं भाग होतं. त्यामुळे सगळं जग जेव्हा कोरोनाच्या संकटाला सामोरं जात होतं, तेव्हा आम्ही कोरोना आणि करीना दोघांनाही सामोरे जात होतो.' 

स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधीच्या पत्निचे आयुष्य खडतर ; सांगितला अनुभव 

'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत करिना आणि आमिर दिसणार आहेत. या चित्रपटाचे शुटिंग मार्च 2019 मध्ये सुरू झाले. 'लाल सिंग चढ्ढा' हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' या चित्रपटाचा रिमेक आहे. 2020 मध्ये ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. या मुलाखतीमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.from Manoranjan Feeds https://ift.tt/3tig9Du

मुहूर्त ठरला; प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ही प्रसिद्ध अभिनेता विष्णू विशालशी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ज्वालाचं हे दुसरं लग्न आहे. येत्या २२ एप्रिल रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ज्वाला आणि विष्णूचा साखरपुडा पार पडला होता. आता विष्णूने सोशल मीडियावर लग्नपत्रिका पोस्ट करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. या लग्नसोहळ्याला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणीची उपस्थित राहतील. गेल्या काही वर्षांपासून ज्वाला आणि विष्णू एकमेकांना डेट करत आहेत. 'जीवन हा एक प्रवास आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करा. नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे', असं लिहित विष्णूने लग्नपत्रिका पोस्ट केली. या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

ज्वाला गुट्टाने आतापर्यंत कॉमनवेल्थ, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यांसारख्या स्पर्धांमध्ये अनेक पदकं पटकावली आहेत. २०१० मध्ये तिने कॉमनवेल्थ स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं होतं. तर विष्णू विशाल हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. 

हेही वाचा : शाहरुखइतकं मानधन मागितल्याने करणने करिनाशी धरला होता अबोला

ज्वालाने २००५ मध्ये बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २०११ मध्ये ज्वालाने चेतनला घटस्फोट दिला. तर २०११ मध्येच विष्णूने रजनी नटराजनशी लग्न केलं होतं. २०१८ मध्ये रजनी आणि विष्णू विभक्त झाले. त्यानंतर २०१९ पासून ज्वाला आणि विष्णूच्या अफेअर्सच्या चर्चांना सुरुवात झाली. विष्णू हा अभिनेत्यासोबतच क्रिकेटपटूसुद्धा आहे. टीएनसीएमध्ये क्रिकेट खेळल्यानंतर त्याच्या पाहायला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला रामराम केला. २००९ मध्ये विष्णूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3slLweR

शाहरुखइतकं मानधन मागितल्याने करणने करिनाशी धरला होता अबोला

अभिनेत्री करिना कपूर खान आणि निर्मात-दिग्दर्शक करण जोहर यांनी बॉलिवूडमध्ये अनेकदा एकत्र काम केलं. हे दोघंही इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित कुटुंबातून आलेले असून आता पुन्हा 'तख्त' या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी या दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यामुळे जवळपास नऊ महिन्यांहून अधिक काळ ते एकमेकांशी बोलत नव्हते. 'द अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रात करण जोहरने हा किस्सा सांगितला. "करिनाने खूप जास्त मानधन मागितलं होतं आणि त्यावेळी मला आर्थिक तोटासुद्धा सहन करावा लागला होता. करिनाचा मुझसे दोस्ती करोगे हा चित्रपट प्रदर्शत झाला होता आणि तेव्हाच मी तिला कल हो ना हो या चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यासाठी तिने शाहरुख खानला जितकं मानधन मिळतंय, तितकंच मलासुद्धा मिळालं पाहिजे असा अट्टहास धरला होता. मी तिला म्हटलं ते शक्य नाही", असं करणने त्यात सांगितलं. 

"मला खूप दु:ख झालं होतं. मी तिला फोन करत होतो पण तिने फोन उचलला नाही. त्यानंतर लगेचच मी प्रिती झिंटाला ती भूमिका दिली. वादानंतर करिना आणि मी जवळपास वर्षभर बोलत नव्हतो. आम्ही पार्ट्यांमध्ये भेटायचो, पण कधीच एकमेकांशी बोलायचो नाही. तो खूपच मूर्खपणा होता", असं तो पुढे म्हणाला. 

हेही वाचा : मलायका-अर्जुनने गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीमुळे चर्चेला उधाण

करण जोहरचे वडील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना करिनाने त्याला कॉल केला. त्यावेळी करिनाने करणची माफीसुद्धा मागितली. त्यानंतर करिनाने धर्मा प्रॉडक्शन्सच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. 'गुड न्यूज', 'एक मै और एक तू', 'व्ही आर फॅमिली', 'कुर्बान' आणि 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटांमध्ये करिनाने भूमिका साकारल्या. from Manoranjan Feeds https://ift.tt/3uGfvQu

बाळंतपणानंतर वाढलेले वजन कसे कमी करायचे? वाचा अनुष्काच्या न्युट्रीशियनच्या टिप्स

मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला. तीचे नाव त्यांनी वामिका ठेवले. त्यानंतर अनुष्काने तिच्या डिलेव्हरीनंतरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटो पाहून तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, अनुष्काने डिलेव्हरीनंतर तिचे वजन कसे कमी केले. डिलेव्हरीच्या आधी आणि नंतरचे बिफोर आफ्टर फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केले होते. अनुष्काने डिलेव्हरीनंतर फिगर फिटनेस कसा ठेवला असेल? तिने नेमके कोणते डायट फॉलो केले असेल? असे अनेक प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर त्याचे उत्तर अनुष्काच्या न्युट्रीशियन रेयान फर्नांडोने दिले आहे.

स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधीच्या पत्निचे आयुष्य खडतर ; सांगितला अनुभव

अनुष्काच्या न्युट्रीशियन रेयान फर्नांडोने सांगितले की, नॉर्मल डिलिव्हरी झाली तर रिकव्हर व्हायला 16 आठवडे आणि सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास रिकव्हर व्हायला 30 आठवडे लागतात. गरोदरपणाच्या  काळात स्त्रीच्या शरिरात  प्लेसेंटा आणि एम्‍निओटिक फ्लूइड असतो. डिलेव्हरी नंतर तो निघून गेल्यावर गरोदर स्त्रीचे वजन कमी होऊ लागते. पण  गरोदरपणाच्या काळात तयार झालेले फॅट मात्र निघत नाही. ब्रेस्ट मिल्क फिडींगमुळे स्त्रीचा ब्रेस्टचा आकार वाढतो. त्यामुळे बॉडीचा शेप बिघडतो न्युट्रिशनिस्ट रेयान फर्नांडो यांचे म्हणणे आहे की, बाळंतपणानंतर बॉडीचा शेप ज्या प्रकारे बदलतो, त्यावरून सहज ओळखता येते की स्त्रीसाठी कोणत्या प्रकारचा वेट लॉस प्लॅन योग्य ठरेल.

पंधरा सिनेमे, सलमानच्या रोलचं नाव 'प्रेम'; वाचा काय आहे कारण!

जर गरोदरपणाच्या काळात पोटाच्या आसपास जास्त फॅट जमा झाले असेल तर डिलिव्हरीनंतर लगेचच बॉडीला पुन्हा शेपमध्ये येण्यास वेळ लागू शकतो. मात्र यावर न्युट्रिशियन रेयान फर्नांडो हिने काही टिप्स अनुष्काला तिच्या डिलेव्हरीनंतर दिल्या. त्या टिप्स त्यांनी तिच्या फॅन्ससोबत देखील शेअर केल्या आहेत.
 
डिलेव्हरीनंतर संतुलित आहार घेणे अत्यंत महत्वाचे असते. डिलेव्हरीनंतर स्त्रीचा संतुलित आणि पौष्टिक आहार असावा असे न्युट्रिशनिस्ट रेयान फर्नांडोचे म्हणणे आहे. वजन कमी करण्यासाठी सतत जिममध्ये जाऊन वर्क आऊट करणे गरजेचे नसते. डिलेव्हरीनंतर स्त्रीचे शरीर जिमच्या वर्क आऊटसाठी तयार नसते. अशा वेळी संतुलित आहार घेऊन पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे असते. यामुळे स्त्रीचे वजन नियंत्रीत राहू शकते. यासाठी न्युट्रिशनिस्टचा सल्ला घेऊन त्यांनी दिलेला विशेष डायट प्लॅन फाॅलो करावा. 

 

अनेक वेळा महिला त्यांच्या बाळाला ब्रेस्ट फिडींग करताना चुकीच्या पध्दतीने बाळाला धरतात. ब्रेस्ट फिडींग करताना कंबरेच्या मागे उशी ठेवावी. याशिवाय संतुलन वाढवणारे व्यायाम करण्यावर भर द्यावा. बाळंतपणानंतर व्यायाम केल्याने वजन कमी करण्यात, चांगली झोप मिळवण्यात, पचनशक्ती सुधारण्यात, एनर्जी वाढवण्यात मदत मिळते. तुम्ही मेडीटेशन आणि डीप ब्रीथिंगचा व्यायाम देखील करू शकता. कारण यामुळे एंग्‍जायटी आणि पोस्‍टपार्टम डिप्रेशनचा धोका कमी होतो. आहारात स्त्रीने शक्य तितके हलके पदार्थ खावेत. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थापासून दूरच राहावे. अन्यथा आई व बाळासाठीही धोका निर्माण होऊ शकतो. 

न्युट्रिशनिस्ट रेयान फर्नांडो यांनी सांगितले की, डिलेव्हरी नंतर योग्य वेळ झोप घेणे खूप महत्वाचे आहे. गरोदर स्त्रीने शक्य तितकी झोप घ्यावी आणि आराम करावा. स्त्री जेवढी जास्त झोप घेईल तेवढे तिचे शरीर निरोगी राहील आणि वजन देखील नियंत्रणात राहील.from Manoranjan Feeds https://ift.tt/3ack8Km

स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधीच्या पत्नीचे आयुष्य खडतर; सांगितला अनुभव

मुंबई : स्कॅम 1992 या वेब सिरीजमधील अभिनयामुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेला कलाकार म्हणजे प्रतिक गांधी. त्याच्या या वेब सिरीजने त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. प्रतिकच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती खूप कमी प्रेक्षकांना माहित आहे. त्याचे आणि त्याची पत्नी भामिनी गांधीचे आयुष्य हे खूप संघर्षमय आहे. प्रतिकची पत्नी भामिनी देखील अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. 'साराभाई VSसाराभाई', 'खिचडी' या प्रसिध्द मालिकेमध्ये भामिनी गांधी हीने काम केले आहे. हिंदी बरोबरच गुजराती मालिकांमध्ये देखील भामिनीने काम केले आहे. 

पंधरा सिनेमे, सलमानच्या रोलचं नाव 'प्रेम'; वाचा काय आहे कारण!

'न बोले तुम न मैंने कुछ कहा' या प्रसिध्द मालिकेमध्ये भामिनीने काम केले आहे. भामिनीला 2012-13 मध्ये ब्रेन ट्यूमर हा आजार झाला होता. एका मुलाखतीमध्ये तिने या आजाराबाबत माहिती दिली होती. मुलाखतीत भामिनीने सांगितले, 'मी देवाचे आणि माझ्या सर्जनचे आभार मानते. माझ्या सर्जनने मला ट्युमरबाबत वेळीच सांगितले. ट्युमर सर्जरीच्या वेळेस माझ्या चेहऱ्यांच्या नसांवर परिणाम होणार होता. त्यामुळे माझा चेहरा बिघडू शकला असता. '

भामिनीने प्रतिकसोबत 2009 मध्ये लग्न केले. दोघे एकमेकांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडीयावर शेअर करतात. भागिनी आणि प्रतिकाला 2014 मध्ये एक गोंडस मुलगी झाली. तिचे नाव त्याने मिराया असे ठेवले आहे.from Manoranjan Feeds https://ift.tt/3sptjxn

मलायका-अर्जुनने गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीमुळे चर्चेला उधाण

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या सर्वांत चर्चेत असलेलं अफेअर म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं. सुरुवातीला या दोघांनीही डेट करत असल्याच्या चर्चांवर मौन बाळगलं. मात्र आता दोघंही उघडपणे नात्याचा स्वीकार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कुठल्याही पार्टीत किंवा कार्यक्रमात या दोघांवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. मलायका आणि अर्जुनने आता त्यांच्या नात्याला सर्वांसमोर कबूल केलं असतानाच या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यामागचं कारण म्हणजे मलायकाने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केलेला तिचा फोटो. या फोटोत मलायकाच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळतेय. 

मलायकाने एका ज्वेलरी ब्रँडसाठी जाहिरात केली आहे. त्याचसाठीचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र तिच्या हातातील अंगठी पाहून खरंच अर्जुनने मलायकासोबत साखरपुडा केला की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी दोघांना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. 

हेही वाचा : सोनाली कुलकर्णी ते प्राजक्ता माळी... मराठी अभिनेत्रींच्या नऊवारीचा नखरा!

मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायकासोबत लग्न करण्याच्या प्रश्नावर अर्जुनने 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "मी इतक्यात लग्नाचा विचार करत नाही. लग्न कधी करतोयस, हा भारतात सर्वांधिक विचारला जाणारा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या मुलीसोबत तीन दिवस जरी असलात, तरी लोकं तुम्हाला विचारतील की, लग्न कधी करताय? पण मला अजून वेळ हवा आहे. जर मी माझ्या नात्याला लपवलं नाहीये, तर मग मी लग्नाबद्दल का लपवून ठेवू?"

मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या वयातील अंतर हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. अर्जुनपेक्षा मलायका वयाने मोठी असल्याने ही जोडी चर्चेत राहिली आहे. वयातील अंतराबाबत मलायका एका मुलाखतीत म्हणाली, "जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा वयातील अंतराचा काही फरक पडत नाही. दोघं एकमेकांना किती समजून घेतात, किती प्रेम करतात हे महत्त्वाचं आहे. पण आपल्या समाजात वेळेनुसार विचारांमध्ये हा बदल होताना दिसत नाही. इथे मुलगी वयाने मोठी असली तरी टिकाटिप्पणी होते आणि ती लहान असली तरी प्रश्न उपस्थित केले जातात." 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3mI9eRA

सोनाली कुलकर्णी ते प्राजक्ता माळी... मराठी अभिनेत्रींच्या नऊवारीचा नखरा!

साडी हा भारतीय स्त्रियांचा पारंपरिक पोशाख. भारतीय पारंपरिक पेहरावात नऊवारी साडीचं स्वत:चं असं स्थान आहे. 

आजही सण-समारंभ, लग्नकार्य, शाळा-कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नऊवारी किंवा पाचवारी साडीचा नखरा हमखास पाहायला मिळतो. 

मुलींसाठी एथनिक वेअर किंवा फेव्हरेट फेस्टिव्ह वेअरच्या यादीत नऊवारी हळूहळू वरच्या क्रमांकावर येतेय. 

हल्ली लग्नसोहळ्यात वधूबरोबरच तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईकसुद्धा नऊवारी नेसण्याची हौस भागवतात. 

नऊवारीचा हा नखरा मराठी कलाकारांमध्येही पाहायला मिळतो. 

वेस्टर्न लूकसोबतच मराठी कलाकारांच्या नऊवारी साडीतील लूकला सोशल मीडियावर विशेष पसंती मिळते. 

सेलिब्रिटींचा मग हाच नऊवारीतील लूक चाहते फॉलो करू पाहतात. 

आता नऊवारीचा समावेश रेडी टू वेअर कपड्यांमध्ये झाल्यापासून स्टिच्ड नऊवारी अगदी ऑनलाइन मार्केटमध्येही उपलब्ध झाली आहे. 

कोळी पद्धत, ब्राह्मणी पद्धत, मराठी पद्धत, पेशवाई पद्धत, लावणी पद्धत अशा नऊवारी साडी नेसण्याच्या अनेक पद्धती आहेत.from Manoranjan Feeds https://ift.tt/32cmkwV