Power Bank ||Best Earning App 2021Army Of The Dead Trailer व्हायरल : हुमाचा कडक लूक पाहाच! 

मुंबई - कोरोनाचा विळखा घट्ट होत असला तरी मनोरंजन क्षेत्रात चित्रपट आणि मालिकांमधील घडामोडी सुरुच आहेत. वास्तविक गेल्या महिनाभरापासून कोरोनानं मनोरंजन क्षेत्राला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्याचा परिणाम दिसून आला आहे. गेल्या वर्षांपासून रखडलेल्या काही चित्रपट आणि मालिकांचे प्रदर्शन कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचा परिणाम निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर झाला आहे. दोन आठवड्यांपासून वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखाही प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र आता सगळे लक्ष कोरोनाकडे लागले आहे. अशातच प्रसिध्द अभिनेत्री हुमा कुरेशीचा आर्मी ऑफ द डेड या हॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याला नेटक-यांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ब-याच काळानंतर हुमा कुरेशी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

जॅक स्नायडर याची झॉम्बी फिल्म ' आर्मी ऑफ द डेड' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हुमा कुरेशी ही बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्या ट्रेलरमधील हुमाचा लूक सर्वांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. गेल्या वर्षी तिची लैला नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्यात तिनं मुख्य भूमिका साकारली होती. आर्मी ऑफ द डेड मध्ये तिनं गीताची भूमिका साकारली आहे. त्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते की, डेव बॉतिस्टानं लास वेगासमधून दोनशे मिलियन डॉलर लुटण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यानिमित्तानं लास वेगासमध्ये काही महिला आणि पुरुष येत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

चित्रपटात जॉबी नावाची एक फौजही दाखविण्यात आली आहे. त्यात झॉम्बीचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. त्या ट्रेलरमध्ये हुमाचा एक वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. 2004 मध्ये आलेल्या डॉन ऑफ द डेड या चित्रपटाचा आर्मी ऑफ द डेड हा सीक्वेल आहे. त्या चित्रपटाची निर्मितीही जॅक स्नायडरनं केली होती. आणि आताचा भागही तोच बनवणार आहे. या चित्रपटानंतर हॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात झॉम्बी मुव्हीज तयार व्हायला सुरुवात झाली.

 हुमाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती लवरकच अक्षय कुमार बरोबर बेलबॉटम या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसेन दिसणार आहे. हुमाचा आर्मी ऑफ द डेडमध्येही महत्वाचा लूक आहे. 

 from Manoranjan Feeds https://ift.tt/2RyzimG

कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें