Power Bank ||Best Earning App 2021अपरिचितच्या हिंदी रिमेकमध्ये रणवीर साकारणार प्रमुख भूमिका

मुंबई : प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच चित्रपटांमध्ये चॅलेंजिंग भूमिका करत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. चित्रपटांमधील अभिनयामुळे रणवीरचा चाहता वर्ग मोठा आहे. साऊथ चित्रपटसृष्टीतील टेम्पर चित्रपटाचा रिमेक सिंम्बामध्ये रणवीर सिंगने काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगणने या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केले. टेम्पर चित्रपटातीमध्ये प्रमुख भूमिका अभिनेता ज्युनियर एन टी आर यांनी केली होती. 

'एक नारळ दिलाय दर्या देवाला..'; पहा रितेशचा भन्नाट डान्स 

सिम्बानंतर आता रणवीर आणखी एका साऊथ चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ सुपर हिट चित्रपट 'अनियन' चा हिंदीमध्ये डब केलेला हिंदी चित्रपट म्हणजेच 'अपरिचित'चा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अपरिचित चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका अभिनेता विक्रम यांनी केली आहे. अपरिचित चित्रपट प्रदर्शित होऊन 15 वर्षे झाली पण विक्रम यांचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांच्या आजही पसंतीस पडतो. आता विक्रम यांच्यासारखा प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा अभिनय रणवीर चित्रपटात साकारू शकेल की नाही याची उस्तुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. 

 

रणवीरने नुकताच सोशल मीडियावर दिग्दर्शक, लेखक एस शंकर आणि जयंतीलाल गडा यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला रणवीरने कॅप्शन दिले, 'शंकर सरांच्या चित्रपटाचा एक भाग होण्याची मला संधी मला मिळाली याची मला धन्यता वाटते.'from Manoranjan Feeds https://ift.tt/3gbgpk2

कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें