भरत जाधवने घेतला लशीचा पहिला डोस; चाहत्यांना केलं आवाहन

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार कोरोना प्रतिबंधक लस घेत नागरिकांमध्येही जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठीतील लोकप्रिय अभिनेता भरत जाधवने नुकताच लशीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर सोशल मीडियावर डॉक्टरांच्या टीमसोबत फोटो पोस्ट करत भरज जाधवने लिहिलं, 'आज सकाळी कोविड १९ लसीकरणाचा पहिला डोस घेतला. डॉक्टरांच्या कठोर परिश्रमाबद्दल मला खूप प्रेम आणि आदर आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही सरकारी नियमाप्रमाणे कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा.'

भरत जाधवनंतर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री रेशम टिपणीसनेही लशीचा पहिला डोस घेतला. त्याआधी सुबोध भावे, सचिन पिळगावकर यांनीसुद्धा लस घेतली. कोरोनाबाधितांची झपाट्याने वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला असून, रोज ३ लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असून सध्याच्या परिस्थितीत ४ लाख ७० हजारपेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण आहेत. 

हेही वाचा : 'रामसेतू'च्या सेटवरील ४५ जणांना कोरोना; जाणून घ्या काय आहे सत्य?

राज्यात बुधवारी कोरोनाचे ५९,९०७ नवे रुग्ण आढळले. राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तर दिवसभरात ३२२ जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या पाच लाखांवर गेली. दिवसभरात मुंबईत १०,४२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3wzUVmx

कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें