बर्फात सोनाली खरेचं शीर्षासन; पतीची कमेंट वाचून हसू होईल अनावर!

अभिनेत्री सोनाली खरेने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाली नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनालीने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये ती बर्फात शीर्षासन करताना दिसतेय. बर्फात कोणताही आधार न घेता ती सहजपणे हे शीर्षासन करतेय. 'जिथे तुमचा कम्फर्ट झोन संपतो, तिथूनच खऱ्या आयुष्याला सुरुवात होते', असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोनालीचा हा व्हिडीओ चाहत्यांना फारच आवडला असून अनेकांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोनालीचा पती बिजय आनंदनेही तिच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केली आहे. 

'शीर्षासन करताना पडतानाचे याआधीचे व्हिडीओ तू पोस्ट केले नाहीस', अशी कमेंट करत बिजयने सोनालीची मस्करी केली. त्यावर काही चाहत्यांनीही ते व्हिडीओ पाहण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं. बिजयने १९९८ मध्ये 'प्यार तो होना ही था' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. काही वर्षे चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर बिजयने अभिनयातून ब्रेक घेतला आणि योगाभ्यासाकडे आपलं लक्ष वळवलं. नंतर बिजय यांनी स्वत:चे योगसाधनेचे सेंटर सुरू केले. 

हेही वाचा : 'मिसेस श्रीलंका' स्पर्धेच्या मंचावर हंगामा; हिसकावलं विजेतीचं मुकूट

मालिकेच्या शूटिंगदरम्यान पडले एकमेकांच्या प्रेमात
बिजय आणि सोनालीची पहिली भेट 'रात होने को है' या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, पण प्रेम व्यक्त करण्यासाठी पुढाकार घेणार कोण, असा गोंधळ दोघांच्याही मनात सुरू होता. अखेर बिजयने पुढाकार घेत सोनालीला प्रपोज केलं. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाली आणि बिजयने लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगी असून सनाया असं तिचं नाव आहे. from Manoranjan Feeds https://ift.tt/39ORuOX

कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें