Power Bank ||Best Earning App 2021माधुरीची ब्युटी, नोराचा तोरा, मेरा पिया घर आया वर थिरकल्या 'डान्सिंग क्वीन' 

मुंबई -  बॉलीवूडमधील सर्वात भारी डान्सर कोण यावर कोणीही बिनधास्तपणे उत्तर देईल की माधुरीच. मात्र आता ती आता बॉलीवूडपासून लांब गेली आहे. ती आता डान्सिंग शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते. सध्या तरुणाईमध्ये नोरा फतेहीची मोठी क्रेझ आहे. तिच्या हटके डान्सिंग स्टाईलवर सगळे फिदा आहेत. या दोन्ही डान्सिंग स्टार एकत्र डान्स करताना दिसल्या तर, माधुरीला डान्सिंग दिवा असे म्हटले जाते. एका शो मध्ये माधुरी आणि नोरानं एकत्रित डान्स केला. तेव्हा त्या दोघींच्या परफॉर्मन्सनं सगळ्यांना चकित केलं. आणि उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. टेलिव्हिजनवर प्रसिध्द असणारा डान्स दिवाने च्या तिस-या सीझनमधील एका भागात त्या टेलिकास्टला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

नोरा डान्स दिवाने च्या 3 सीझनमध्ये पाहुणी कलाकार म्हणून नोरा फतेही आली होती. त्यावेळी माधुरी आणि तिनं मेरा पिया घर आया या गाण्यावर डान्स केला. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला. त्या गाण्याचा व्हिडिओ माधुरीनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला. तो सध्या कमालीच्या वेगानं व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ट्रेंडिगचा विषय म्हणूनही त्याला सर्वजण पसंत करत आहे. माधुरी स्वताही नोराच्या डान्सची फॅन आहे. तिची डान्सिंग स्टाईल सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. ज्यावेळी त्या दोघींनी डान्सला सुरुवात केली त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या सेटवर एक वेगळाच माहौल तयार झाला होता. प्रेक्षकांनीही त्या दोघींच्या परफॉर्मन्सचं कौतूक केलं.

माधुरीनं इंस्टावर त्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती आणि नोरा डान्स करत आहेत. दोघींच्या फॅन्सनं त्या व्हिडिओला पसंती दिली आहे. लाईक्स आणि कमेंटसही दिल्या आहेत. मेरा पिया घर आया हे माधुरीचं हिट गाणं आहे. आजही प्रेक्षकांच्या मनात माधुरीनं त्या गाण्यावर केलेल्या डान्सच्या आठवणी ताज्या आहेत. सध्या या शो चा एक ट्रेलर व्हायरल होत आहे. आता हा एपिसोड कधी टेलिकास्ट होतो याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. सध्या वाढत्या कोरोनाचा फटका डान्स दिवानेच्या 3 सीझनमध्ये बसला होता. त्या मालिकेतील जज धर्मेश याच्याबरोबर आणखी 3 जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

 
 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3as5jDF

कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें