'मला आमिर खान मिस्टर परफ्केशनिस्ट वाटत नाही'; सान्याला असं का वाटलं?

मुंबई -  प्रसिध्द अभिनेता आमिर खान याच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आमिर खाननं आपण सोशल मीडिया सोडणार असल्याचे सांगितले  होते. त्यांना तो निर्णय का घेतला याचे योग्य स्पष्टीकरण मिळाले नसले तरी त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रिकरणावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले होते. आता आमिरच्या नावाची चर्चा म्हणजे त्याच्या दंगल चित्रपटात काम केलेली आणि पुढे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सान्या मल्होत्रानं त्याच्याविषयी एक प्रतिक्रिया दिली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सान्याला आमिर हा परफेक्शनिस्ट वाटत नसल्याचे तिचे म्हणणे आहे.

सान्याचा नुकताच पगलैट नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका विधवा मुलीला समाजात कशाप्रकारे गृहित धरले जाते. तिच्या मनाचा विचार न करता तिला कशाप्रकारे वागवले जाते या गोष्टीवर भाष्य करणारा हा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस पडला आहे. त्यात सान्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी दाद दिली आहे. या चित्रपटात सान्याची प्रमुख भूमिका होती. त्यात तिनं कमाल केली आहे. ज्या पध्दतीनं तिनं विधवा मुलीची भूमिका साकारली आहे त्यावरुन तिच्या कामाचे कौतूक होत आहे. आता मात्र सान्या आमिरविषयी दिलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या नजरेत आली आहे. तिच्या त्या वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. ज्या आमिर खानच्या दंगल चित्रपटातून तिला ब्रेक मिळाल्या त्याच्याविषयी तिनं अशाप्रकारचे वक्तव्य का केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सान्यानं एका मुलाखतीच्या दरम्यान आमिर खानबद्दल काय वाटते याविषयी सांगितले. ती म्हणाली, माझ्या मते आमिर हा काही परफेक्शनिस्ट अभिनेता नाही. तो एक पॅशन असलेला अभिनेता आहे. त्याच्यासाठी परफेक्शन हा नकारात्मक शब्द आहे. आमिर त्याच्या स्वतसाठी फार कडक आहे. तो शिस्तप्रिय आहे. आपल्याला जे काम करायचे त्यासाठी शंभर टक्के योगदान देण्याची त्याची मानसिकता असते. त्यात तो यशस्वी होतो. ही त्याच्या कामाची पध्त आहे. मी माझ्या कामासाठी फारच प्रॅक्टिकल आहे. माझा असा कुठला चित्रपट नाही की मी त्याबाबत असे म्हणू शकेल की, यापेक्षा मला आणखी चांगले काम करता आले असते.

सान्यानं आमिरच्या दंगलमधून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यात तिनं बबीता फोगटची भूमिका केली होती. या चित्रपटात तिच्या वाट्याला फार मोठी भूमिका आली नव्हती तरी देखील तिच्या छोट्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. सान्या आगामी काळात तिच्या लव होस्टल नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. त्यात तिच्या जोडीला विक्रांत मैसी आणि बॉबी देओल हे कलाकार असणार आहेत.  
 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/2Ouknsz

कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें