UPSC करतायं मग Aspirants वेबसीरिज तुमच्यासाठीच; ट्रेलर व्हायरल 

मुंबई - वेबसीरिजच्या दूनियेत दरवेळी नवनवीन प्रयोग होताना दिसतात. केवळ लव्ह, क्राईम आणि सेक्स या त्रिसुत्रीवर आधारित मालिकांचा भरणा मोठा आहे. अशा ढीगानं वेबसीरिज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्या मालिकांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. त्याला पसंतही केले जात आहे. त्यामुळेच की काय अजूनही त्या तीन गोष्टींवर मालिका तयार होण्याचे प्रमाणाही जास्त आहे. अशातच काही निर्माते आणि दिग्दर्शक प्रेक्षकांना हटके देण्याचं धाडस दाखवतात. त्यांच्या त्या नवनवीन कल्पनांना चांगला प्रेक्षकवर्ग मिळत असल्याचे दिसून आले आहे. टीव्हीएफनं यापूर्वी प्रदर्शित केलेल्या मालिकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यात कोटा फॅक्टरी, पंचनामा, गुल्लक भाग १,२, पर्मनंट रुममेट्स, या मालिकांची नावं सांगता येतील.

सध्या टीव्हीएफची एक नवी मालिका येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. त्या मालिकेचे नाव Aspirants असे आहे. ही मालिका युपीएससी परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना समर्पित करण्यात आली आहे. त्या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. तो ट्रेलर पाहिल्यानंतर त्यात काय असणार आहे याची कल्पना प्रेक्षकांना आली आहे. गेल्या काही वर्षांपासून टीव्हीएफनं दर्जेदार मालिकांची निर्मिती केली आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. आता या नव्या मालिकेची त्यांना उत्सुकता आहे. या मालिकेत राजेद्रनगर मधील एक गोष्ट दाखवण्यात आली आहे. तो भाग युपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी ओळखला जातो. 

Aspirants मध्ये एका विद्यार्थ्याला युपीएससी क्रॅक करण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो याचे चित्रण करण्यात आले आहे. भारतीय प्रशासनाममध्ये सर्वाधिक अवघड असणारी परिक्षा म्हणून युपीएससीचा उल्लेख केला जातो. देशभरातून लाखो विद्यार्थी या परिक्षेची तयारी करत असतात. त्यात फार कमी जणांना यश मिळते. स्पर्धा परिक्षा देणा-यांच्या कथा सर्वांना माहिती आहे. पहिल्या प्रयत्नात अशा परिक्षा देणा-यांची संख्या कमी आहे. काहींनी पाच ते दहा वर्षे अभ्यास करुनही त्यांना यश मिळाले नसल्याचे दिसुन आले आहे.

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 एप्रिलपासून यु ट्युबवर ही मालिका स्ट्रीम करण्यात आली आहे. त्यापूर्वी त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्य़ात आला होता. या मालिकेत नवीन कस्तुरिया मुख्य भूमिकेत आहे. त्याबरोबरच शिवानी परिहार, अभिलाष त्रिपाठी, सनी हिंदूजा, नमिता दूबे यांच्याही त्या मालिकेत भूमिका आहेत. प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांनी या मालिकेचा ट्रेलर शेअर केला असून त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. 
 

 
 from Manoranjan Feeds https://ift.tt/3cVlmuZ

कोई टिप्पणी नहीं:

टिप्पणी पोस्ट करें